गावासाठी काय केलं! विचारणाऱ्या तरुणाला काँग्रेस आमदाराने दिला चोप...(पहा व्हिडिओ)

मतदारसंघात केलेल्या कामावर प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणास मारहाण केल्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
गावासाठी काय केलं! विचारणाऱ्या तरुणाला काँग्रेस आमदाराने दिला चोप...(पहा व्हिडिओ)
गावासाठी काय केलं! विचारणाऱ्या तरुणाला काँग्रेस आमदाराने दिला चोप...(पहा व्हिडिओ)Saam Tv

वृत्तसंस्था : पंजाब काँग्रेसचे आमदार जोगिंदर पाल यांनी त्यांच्या मतदारसंघात केलेल्या कामावर प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणास मारहाण केल्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकी अगोदर सत्ताधारी पक्षाच्या अडणचणींमध्ये आणखी भर घातली आहे. पाल हे पठाणकोट जिल्ह्यामधील भोआमध्ये लोकांना संबोधित करत होते. त्यावेळेस त्या ठिकाणी आलेल्या तरुणाने प्रश्न विचारना केल्यावर पाल यांनी त्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली आहे.

हे देखील पहा-

पठाणकोटच्या भोआ विधानसभा मतदारसंघाचे आमदार जोगिंदर पाल यांनी पंजाबच्या राजकारणात परत एकदा खळबळ उडवून दिली आहे. यामुळे आता पंजाब काँग्रेससमोर नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. एका बैठकी दरम्यान, एका व्यक्तीने जोगिंदर पाल सिंग यांना एक प्रश्न विचारला होता, तो ऐकून ते खूप चिडले. त्यांनी भर सभेतच त्या तरुणाला मारहाण करण्यास सुरवात केली होती. बैठकीत तैनात असलेल्या पोलिसांनी देखील तरुणांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली आहे.

हा व्हिडिओ नवरात्रांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार जोगिंदर पाल हे एका गावात कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता आले होते. एका व्यक्तीने त्यांना तुम्ही गावाकरिता काय केले? अशी विचारणा केली. यावरुन आमदार पाल खूपच भडकले. त्यांनी त्या व्यक्तीला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या सुरक्षा रक्षकाने देखील त्या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली होती.

गावासाठी काय केलं! विचारणाऱ्या तरुणाला काँग्रेस आमदाराने दिला चोप...(पहा व्हिडिओ)
विवाहित मामेबहिणी सोबत अनैतिक सबंध; नवरा घरी नसताना भेटायला आला अन्...

या घटनेदरम्यान त्याठिकाणी उभे असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका घेतली आहे. आमदार पाल यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा हा लज्जास्पद व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आमदार जोगिंदर पाल त्या तरुणाला मारहाण करताना दिसून येत आहेत.यावेळी आमदार पाल यांच्यासह सहकाऱ्यांनी त्या तरुणाला अनेक वेळा मारहाण केली होती. जेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला दाबून ठेवण्यात आले आहे.

एका पोलिसाने हस्तक्षेप करत त्याला बाजूला नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तरीही त्याला मारहाण करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आमदार असून असे वागू नये. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि त्यांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आहोत, असे त्यांनी यावेळी म्हंटले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com