'यात चूक काय...' राहुल गांधींच्या 'पब' व्हिडिओवर काँग्रेसचे स्पष्टीकरण

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेपाळ दौऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ते काठमांडूमधील नाईट क्लबमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओवरून भाजपने काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. आता या व्हिडिओवर काँग्रेसने स्पष्टीकरण देताना भाजपवर टीका केली आहे.
'यात चूक काय...' राहुल गांधींच्या 'पब' व्हिडिओवर काँग्रेसचे स्पष्टीकरण
Rahul Gandhi Pub Video Controversy News, Congress On Rahul Gandhi Pub VideoTwitter/@KirenRijiju

नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेपाळ दौऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये ते काठमांडूमधील नाईट क्लबमध्ये दिसत आहेत. या व्हिडिओवरून भाजपने काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला आहे. आता या व्हिडिओवर काँग्रेसने स्पष्टीकरण देताना भाजपवर टीका केली आहे. (Rahul Gandhi Pub Video Controversy News)

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, या व्हिडिओमध्ये काहीही चुकीचे नाही. ते म्हणाले, राहुल गांधी त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडूला गेले आहेत. हा त्यांचा वैयक्तिक दौरा आहे. लग्न समारंभाला हजेरी लावणे ही आपल्या संस्कृतीची आणि सभ्यतेची बाब आहे.

कुणाच्या लग्नाला उपस्थित राहणे गुन्हा नाही : सुरजेवाला

ते म्हणाले, लग्न करणे, कुणाशी मैत्री करणे किंवा लग्न समारंभाला उपस्थित राहणे या देशात अजूनतरी गुन्हा नाही. कदाचित आजनंतर पंतप्रधान मोदींनी ठरवावे की लग्नाला उपस्थित राहणे बेकायदेशीर आहे आणि मैत्री करणे हा गुन्हा आहे. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, राहुल गांधी पंतप्रधान मोदींप्रमाणे पाकिस्तानला न बोलावलेले पाहुणे म्हणून गेलेले नाहीत. राहुल गांधी मित्र राष्ट्र नेपाळमध्ये एका मैत्रिणीच्या खाजगी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले आहेत. त्यांनी सांगितले, राहुल गांधी ज्या मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते ती एक पत्रकार आहे.

भाजपने व्हिडिओ व्हायरल केला आणि राहुल गांधींचा व्हिडिओ शेअर करताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्यावर निशाणा साधला, व्हेकेशन, पार्टी, हॉलिडे, प्लेजर ट्रिप, खासगी विदेश दौरा आदी गोष्टी देशासाठी नवीन नाहीत. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, जोधपूरमध्ये हिंसाचार होत असताना राहुल गांधी काय करत आहेत ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, राजस्थान सध्या जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत.

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओमध्ये राहुल गांधी काठमांडू इथल्या एका क्लबमध्ये आहेत. हा व्हिडीओ नेपाळच्या लॉर्ड ऑफ द ड्रिंक्सचा असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाचे सोशल मीडिया प्रभारी अमित मालवीय (Amit Malviya) यांनी हा व्हिडीओ शेअर केला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.