WhatsApp : तुमच्या चॅटचा बॅकअप आता फोन, लॅपटॉप आणि PC वर मिळणार, 'ही' माहिती अवश्य वाचा

व्हाट्सअॅप मेसेंजर अॅप्लिकेशन त्यांच्या युजर्सला नवीन फिचर देण्यासाठी भन्नाट प्रयोग करत आहे.
WhatsApp : तुमच्या चॅटचा बॅकअप आता फोन, लॅपटॉप आणि PC वर मिळणार, 'ही' माहिती अवश्य वाचा
WhatsApp New feature Saam Tv

सर्वात लोकप्रिय असलेल्या व्हाट्सअॅप मेसेंजर अॅप्लिकेशन (WhatsApp) आता त्यांच्या युजर्ससाठी एक भन्नाट प्रयोग करत आहे. व्हाट्सअॅपचा केंद्रबिंदू असलेल्या चॅटच्या बॅकअपसाठी युजर्सला नव्या फिचरचा (WhatsApp New Features) उपयोग होणार आहे. नेहमीच व्हाट्सअॅप कंपनीकडून नवनवे प्रयोग करुन युजर्सला आवडतील असे फिचर्स आणले जातात. आताही एका नव्या फिचरमुळं युजर्सला व्हाट्सअॅप चॅटचा बॅकअप (chat back up) नव्या डिव्हाईसवर घेता येणार आहे. म्हणजेच युजर्सला चॅटचा बॅकअप फोन, लॅपटॉप आणि पीसीवर स्टोअर करता येणार आहे.

WhatsApp New  feature
विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार का?, संजय राऊत म्हणाले...

विशेष म्हणजे, Android वापरकर्त्यांना त्यांचे चॅट बॅकअप अॅपच्या बाहेर इतर डिवाइसवर स्टोर करता येणार आहेत. त्यासाठी व्हाट्सअॅप एक नवीन प्रयोग करत आहे. व्हाट्सअॅप चॅटचा बॅकअप वापरकर्ते Google Drive सह लोकल स्टोरेजमध्ये एक्सपोर्ट करु शकतील. तसेच गुगल ड्राईव्हच्या बाहेर चॅटचा बॅकअप घेण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप यूजर्सना परवानगी देईल.

WABetaInfo, WhatsApp च्या नवीन फिचर्सचा मागोवा घेणार्‍या वेबसाइटने यांदर्भात दावा केला आहे. त्यांना चॅट बॅकअप मेनूमध्ये एक नवीन ऑप्शन आढळला आहे. त्यामुळे या नव्या फिचर्सची माहितीही त्यांनी शेअर केले आहेत. महत्वाची बाब म्हणजे हे फिचर बीटा टेस्टर्ससाठीही उपलब्ध नाही, कारण त्यावर प्रयोग केला जात आहे. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप हे फीचर पूर्णपणे काढून टाकेल किंवा वेगळ्या पद्धतीने ऑफर करेल, अशी शक्यता आहे.

WhatsApp New  feature
दिल्लीच्या गफ्फार मार्केटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ३९ गाड्या घटनास्थळी

नवीन बॅकअपही तुम्ही डाउनलोड करू शकता

व्हॉट्सअ‍ॅप Android युजर्सला त्यांच्या चॅटचा गुगलस ड्राईव्हवर (Google Drive) बॅकअप घेण्यासाठी परवानगी देते. याशिवाय नेहमीच तुम्ही प्रायमरी डिव्हाईसवर तुमच्या अकाउंट मध्ये लॉग इन करता, त्यावेळी तुमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये स्टोअर केलेला नवीन बॅकअपही तुम्ही डाउनलोड करू शकता. परंतु, या बॅकअपवर वापरकर्त्यांसाठी कोणतंही नियंत्रण ठेवलं जात नाही. तसेच नवीन फिचरसह वापरकर्ते त्यांच्या लोकल स्टोरेज किंवा इतर कोणत्याही क्लाऊड स्टोरेजवर व्हाट्सअॅपचे चॅट बॅकअप संचयित करु शकतं.

या बॅकअपमध्ये मेसेज, फोटो,व्हिडिओ आणि इतर फाईल्ससह तुमचा सर्व चॅट डेटा असणार आहे. वापरकर्ते या चॅटचा बॅकअप डाउनलोड करू शकतील आणि तो गुगल ड्राईव्हवरही पुन्हा ठेवू शकतील. अत्यंत महत्वाचं म्हणजे वापरकर्त्याला त्यांच्या स्वत:च्या डेटावर अधिक नियंत्रण ठेवता येते. तसचे त्यांच्या आवडीच्या ठिकाणीही संग्रहित करण्याचा पर्याय देते.

लवकरच हे फिचर बीटा परीक्षकांसाठी होणार रोलआउट ?

Android ते iOS आणि iOS ते Android चॅट ट्रान्सफर करण्याचं फिचर असू शकतं. तसेच व्हॉट्सअ‍ॅप एका नव्या पद्धतीचाही वापर करु शकते. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप युजर्स त्यांचे चॅट बॅकअप लोकल स्टोरेजमध्ये डाउनलोड करू शकतात. एव्हढेच नाही तर त्या डिव्हाईसवरील सर्व आवश्यक डेटा मिळविण्यासाठी ती फाइल iOS डिव्हाईसवर ट्रान्सफर करू शकतात. वेबसाईटने दिलेली माहिती अशी की, नवीन फिचर लवकरच बीटा टेस्टर्ससाठी रोल आउट होऊ शकते. त्यावेळी आम्ही या फिचरच्या उपयुक्ततेचे पूर्णपणे मूल्यांकन केले जाऊ शकते.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com