एलॉन मस्कच्या आईला हवंय एडिट बटण; 'त्या' ट्विटमुळे चर्चांना उधाण

Maye Musk asks Twitter Edit Button: इलॉन मस्कच्या आई माये मस्क यादेखील आता ट्विटरला एडिट बटण कुठे आहे असा प्रश्न विचारत आहे.
एलॉन मस्कच्या आईला हवंय एडिट बटण; 'त्या' ट्विटमुळे चर्चांना उधाण
Elon Musks mother Maye Musk asks Twitter to bring the edit button soon, Elon Musks Latest Marathi News, Latest Tech News in MarathiTwitter/ @mayemusk

मुंबई: टेस्ला कार आणि स्पेस एक्स या कंपन्यांचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे आता लवकरच ट्विटरचे मालक होणार आहेत. मस्क (Elon Musk) यांनी याआधीच ट्विटरमध्ये अनेक बदल करण्याचे संकेत दिले आहेत. असं असताना ट्विटरमध्ये ट्विट एडिट करण्याचं बटण हवं अशी मागणी होत असताना लवकरच ट्विटरवर एडिट बटन येण्याचे संकेत मिळत आहेत. एलॉन मस्क यांची आई माये (Maye Musk) मस्क यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये (Tweet) काहीतरी चुक असल्याने ती चुक त्यांना दुरुस्कत करायची आहे. मात्र ट्विटरवर (Twitter) एडिट बटण नसल्यानं हे ट्विट त्यांना एडिट करता येत नाहीये. अशात त्यांनी आपल्याच ट्विटला रिप्लाय करत Where is that edit button? म्हणजे ते एडिट बटण कुठेय असा प्रश्न विचारला आहे. त्यांच्या या ट्विववरुन ट्विटरवर लवकरच एडिट बटण येणार असं बोलंल जात आहे. (Where's edit button?: Musk's mom after mistake in her tweet about Taj Mahal)

हे देखील पाहा -

इलॉन मस्कच्या आई माये मस्क यादेखील आता ट्विटरला एडिट बटण विचारत आहे. माये मस्क यांनी २००७ मध्ये आग्रा येथील ताजमहालला भेट दिली तेव्हा एक फोटो पोस्ट केला. पण नंतर त्यांनी नवीन ट्विटमध्ये २०१२ हे वर्ष दुरुस्त केले आणि ट्विटरला एडिट बटण सुरू करण्यास सांगितले. "2007, 2012 नाही. ते संपादन बटण कुठे आहे? (Not 2007, 2012. Where is that edit button?") असं ट्विट माये मस्क यांनी केले आहे. ट्विटरचे यूजर्स अनेक वर्षांपासून इडिट (संपादन) बटणासाठी विचारत आहेत आणि कंपनीने शेवटी लवकरच हा पर्याय जारी करण्याचे आश्वासन दिले आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने ट्विटरने अधिकृतपणे रिलीझ टाइमलाइन उघड न करता येत्या काही महिन्यांत संपादन बटण (edit button) सादर करण्याची अधिकृत पुष्टी केली आहे. (Elon Musks Latest Marathi News)

Elon Musks mother Maye Musk asks Twitter to bring the edit button soon, Elon Musks Latest Marathi News, Latest Tech News in Marathi
"मी गूढ परिस्थितीत मेलो तर...एलन मस्क यांच्या ट्विटने खळबळ

ट्विटरने पुष्टी केली आहे की ते आधीपासूनच संपादन बटणाच्या पर्यायाची चाचणी करत आहेत. तसेच या पर्यायाचा गैरवापर होऊ नये म्हणून विविध मार्गांचे मूल्यांकन आणि चाचणी करत आहे. एका अहवालानूसार, संपादन बटण संपादित ट्विटचा इतिहास दर्शवू शकते. जेणेकरून वापरकर्ते प्लॅटफॉर्मवर लोकांची दिशाभूल करण्यासाठी गैरवापर करू शकणार नाहीत. दरम्यान एलॉन मस्कच्या आईनं केलेल्या या ट्विटमुळे आता ट्विटरवर लवकरच एडिट बटण येणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.