Corona
CoronaSaam Tv

Omicron Variant: पुन्हा कोरोनाची लाट येणार? WHO ने दिलेला धोक्याचा इशारा गांभीर्याने घेण्याची गरज

जगभरात कोरोनाचे ओमिक्रॉनचे 300 हून अधिक सब व्हेरिएंट आहेत.

मुंबई : कोरोनाच्या (Coronavirus) धोका कमी झाल्यानंतर भारतात सर्व निर्बंध उठवण्यात आले. देशभरातील वातावरण पुन्हा पूर्ववत झालं आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) इशाऱ्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. भारतातील कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट XBB आणि bF.7 चा धोका सातत्याने वाढत आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय की, Omicron च्या XBB सब-व्हेरियंटमुळे जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट येऊ शकते. हा नवा व्हेरिएंट जुन्यापेक्षा किती वेगळा आणि गंभीर आहे हे जाणून घेण्यासाठी आतापर्यंत असा कोणताही डेटा कोणत्याही देशाकडे उपलब्ध नाही.

Corona
Mumbai Police : मुंबईला कसला धोका?, पोलिसांकडून तात्काळ ऑर्डर; १५ दिवस ५ पेक्षा जास्त लोक जमू नका!

जगभरात कोरोनाचे ओमिक्रॉनचे 300 हून अधिक सब व्हेरिएंट आहेत. सध्या फिरत असलेला Axi BB सब व्हेरियंट देखील Omicron चा एक प्रकार आहे. XBB व्हेरिएंटवर अँटिबॉडीजचा काहीही परिमाण होणार नाही आणि प्रतिकारशक्ती कमी करू शकतो. येत्या काही दिवसांत अनेक देशांमध्ये या प्रकारामुळे आणखी एक कोरोना लाट दिसू शकते, असा इशारा डॉ. स्वामीनाथन यांनी दिला आहे.

डॉ. सौम्या स्वामीनाथन पुढे म्हणाल्या की, डब्ल्यूएचओ BA.5 आणि BA.1 च्या डेरिव्हेटिव्ह्जचा मागोवा घेण्यात गुंतलेला आहे. हा व्हायरस जसजसा डेव्हलप होतो तसतसा तो अधिक पसरतो. जो एक प्रकारचा धोक्याचा इशारा आहे. यामुळे या सर्व व्हेरिएंट्सना ट्रॅक करणे सुरू ठेवावे लागेल. यासोबतच सर्व देशांना टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि जीनोम सिक्वेन्सिंग वाढवावी लागेल, असंही डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलंय.

Corona
Invest In MP: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पुण्यात येणार; राज्यातील प्रकल्प पुन्हा परराज्यात जाणार?

तज्ञांच्या मते, XBB आणि BF.7 दोन्ही व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला या प्रकाराचा संसर्ग झाला असेल तर तो अनेक लोकांना संक्रमित करू शकतो. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालून गेल्यास व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका कमी होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com