Who Is Arjun Ram Meghwal : IAS म्हणून जबरदस्त कारकीर्द, नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात एन्ट्री; आता थेट कायदामंत्री

Who Is Arjun Ram Meghwal : मेघवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला 2009 मध्ये सुरुवात केली.
Arjun Ram Meghwal
Arjun Ram MeghwalSaam TV

Who Is Arjun Ram Meghwal : केंद्र सरकारमधील कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना तडकाफडकी मंत्रीपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी आता अर्जुनराम मेघवाल यांची नवे कायदामंत्री म्हणून वर्णी लागली आहे. रिजीजू यांच्या कारकिर्दीत कायदा मंत्रालयाने घेतलेल्या अनेक निर्णयामुळे वाद उभा राहिला होता. यामुळेच त्यांची या पदावरुन गच्छंती करण्यात आल्याचं म्हटलं जात आलं आहे.

कोण आहेत अर्जुनराम मेघवाल?

मेघवाल हे सध्या बिकानेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. केंद्रीय सांस्कृतिक आणि संसदीय कामकाज मंत्री, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि माजी केंद्रीय जलसंपदा मंत्री, गंगा विकास मंत्री म्हणून काम पाहिलं आहे.

मेघवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला 2009 मध्ये सुरुवात केली. त्यांनी भाजपच्या तिकिटावर बिकानेर लोकसभेची पहिली निवडणूक जिंकली. यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा खासदार निवडून आले. केंद्र सरकारमधील वित्त राज्यमंत्री, संसदीय कामकाज मंत्री, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन राज्यमंत्री अशी पदं भूषवली. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बिकानेरमधून सलग तिसऱ्यांदा खासदार निवडून आले. (Latest Marathi News)

Arjun Ram Meghwal
Cabinet Reshuffle: मोठी बातमी! किरेन रिजीजू यांना कायदा मंत्रीपदावरून हटवलं, मोदी सरकारचा मोठा निर्णय

मेघवाली यांची प्रशासकीय (IAS) कारकिर्द

अर्जुनराम मेघवाल यांनी 1977 मध्ये बीकानेरच्या डुंगर कॉलेजमधून बीए आणि एलएलबीची पदवी मिळवली. यानंतर त्यांनी याच महाविद्यालयातून १९७९ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यानंतर 1982 मध्ये, त्यांनी आरएएस परीक्षा उत्तीर्ण केली आणि राजस्थान औद्योगिक सेवेसाठी त्यांची निवड झाली. मेघवाल यांची जिल्हा उद्योग केंद्रात सहाय्यक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमधील उद्योग केंद्रात महाव्यवस्थापक म्हणून काम केले.

त्यांनी तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव, विशेष सचिव, उच्च शिक्षण विभाग, व्यवस्थापकीय संचालक, नागपूर निगम लिमिटेड, राजस्थान, अतिरिक्त आयुक्त, वाणिज्य कर विभागाचा पदभारही सांभाळला. त्यानंतर राजकारणात येण्यासाठी त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली.

रॉबर्ट वड्रांवर कारवाई

मेघवाल यांनी राजस्थानमधील बिकानेर येथील रॉबर्ट वड्रा यांच्या कथित बेकायदेशीर जमिनीचा व्यवहार उघडकीस आणण्याचे काम केले होते, त्यानंतर ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धीझोतात आले होते. यामुळेच ते नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या नजरेत आल्याचं बोललं जात आहे.

Arjun Ram Meghwal
DK Shivakumar Reaction : मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली, शिवकुमार यांच्या मनातलं आलं ओठांवर; अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय!

सायकलिंगची प्रचंड आवड

सरकारने कारपेक्षा मेघवाल यांना सायलक चालवायला अधिक आवडते. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला देखील ते सायकलवरून राष्ट्रपती भवनातही पोहोचले होते. अनेकदा ते संसदेतही सायकलनेच आल्याचं पाहिलं गेलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com