राहुल गांधींची महिला मैत्रिण कोण? ज्यांच्या लग्नासाठी काँग्रेस नेता गेले नेपाळला

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे नेपाळ दौऱ्यावर आहेत.
Rahul Gandhi Latest Marathi News, Congress party news updates, Rahul Gandhi Pub Viral Video
Rahul Gandhi Latest Marathi News, Congress party news updates, Rahul Gandhi Pub Viral VideoSaam TV

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे नेपाळ दौऱ्यावर आहेत. त्यांची एक नेपाळी मैत्रिण सुमनिमा उदास (Sumnima Udas) हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी ते काठमांडूला पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या नेपाळ दौऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी एका नाईट क्लबमध्ये दिसत आहेत. हा नाईट क्लब लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स म्हणून ओळखला जातो. (Rahul Gandhi Latest Marathi News)

काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, सोमवारी काठमांडू विमानतळावर पोहोचल्यानंतर राहुल गांधी आपल्या तीन साथीदारांसह मॅरियट हॉटेलमध्ये थांबले. ते त्यांची नेपाळी मैत्रिण सुमनिमा उदास यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेले होते. (Rahul Gandhi Pub Viral Video)

या संदर्भात सुमनिमाचे वडील आणि नेपाळचे म्यानमारमधील राजदूत भीम उदास म्हणाले 'आम्ही राहुल गांधींना माझ्या मुलीच्या लग्नात येण्याचे निमंत्रण दिले होते.' मंगळवारी लग्नसोहळा होणार असून ५ मे रोजी रिसेप्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुमनिमांचे लग्न निमा मार्टिन शेर्पांसोबत होत आहे. रिपोर्टनुसार, या लग्नसोहळ्यासाठी अनेक महत्त्वाच्या भारतीय सेलिब्रिटीही पोहोचल्या आहेत.

सुमनिमा उदास कोण आहेत?

सुमनिमा उदास यांनी अमेरिकेतील ली विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांनी सीएनएन इंटरनॅशनलसाठी बातमीदार म्हणून काम केले आहे. राजकारण, आर्थिक-सामाजिक, पर्यावरण आणि सामान्य समस्या त्यांनी कव्हर केल्या आहेत. सुमनिमाने 'दिल्ली गँगरेप' प्रकरणातही तक्रार नोंदवली होती.

Rahul Gandhi Latest Marathi News, Congress party news updates, Rahul Gandhi Pub Viral Video
नेपाळच्या प्रसिद्ध नाईटक्लबमध्ये दिसले राहुल गांधी? व्हिडिओ शेअर करत भाजपची टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com