Yasin Malik: टेरर फंडिंग प्रकरणी जन्मठेप झालेला यासिन मलिक कोण आहे?

एनआयएच्या विशेष न्यायालयाने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक यांना दहशतवादी कारवयांना पैसा पुरवल्याबद्दल दोषी ठरवलं होतं.
Yasin Malik
Yasin MalikSaam Tv

नवी दिल्ली : जेकेएलएफचा (JKLF) नेता यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. देशातील मोठा वर्ग यासिन मलिकला (Yasin Malik) फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होता. त्याच्यावर अनेक गंभीर करण्यात आले आरोप आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी त्याला फाशीची शिक्षा होण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे त्याच्या शिक्षेवरुन पाकिस्तानने (Pakistan) भारतावर आरोप केले आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानपासून ते क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीपर्यंत अनेकांनी भारता विरुध्द भाष्य केलं आहे. (Yasin Malik Latest News)

यासिन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोदी सरकारला रोखण्याचे आवाहन शाहबाज शरीफ यांनी संपूर्ण जगाला केले होते. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीही यासीन मलिकच्या समर्थनार्थ पुढे आला होता. 'भारतात मानवी हक्कांसाठी बोलणारे आवाज बंद केले जात आहेत', अस त्याने म्हटले होते. यासिनच्या बचावासाठी अनेकजण पुढं आळे होते. यासीन मलिक कोण आहे, ज्याच्या बचावासाठी संपूर्ण पाकिस्तान भारतावर दबाव आणत होते. आपण पुढं जाणून घेऊया कोण आहे यासिन मलिक (Yasin Malik), त्याच्यावर कोणते आरोप आहेत.

Yasin Malik
Yasin Malik: टेरर फंडिंग प्रकरणी यासिन मलिकला जन्मठेप

काश्मीरमध्ये द्वेषाची बीजे पेरली

३ एप्रिल १९६६ रोजी जन्मलेला यासिन हा एक फुटीरतावादी नेता आहे, जो हिंसाचारात देशाला ढकलण्याचे काम करत आहे. यासीनने ८० च्या दशकात 'ताला पार्टी' स्थापन केली होती. याच पक्षाच्या माध्यमातून त्याने काश्मीरमध्ये द्वेषाची बीजे पेरली. यासीनने नंतर आपल्या पक्षाचे नाव बदलून दहशतवाद्यांना आश्रय दिला. १९८६ मध्ये त्याने आपल्या पक्षाचे नाव बदलून इस्लामिक स्टुडंट्स लीग (ISL) असे केले जेणेकरून अधिकाधिक तरुणांना आपल्या संघटनेत सहभागी करून घ्यावे. तरुणांना जोडून संघटना मजबूत करणे आणि खोऱ्यातील द्वेषाची ठिणगी पेटवून काश्मीर भारतापासून वेगळे करणे हे त्याचे ध्येय होते. यासिनच्या संघटनेत अनेक दहशतवादी सामील होते, त्यापैकी जावेद मीर, अशफाक मजीद वानी आणि अब्दुल हमीद शेख या दहशतवाद्यांची नावे आहेत.

Yasin Malik
Breaking : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल

केंद्राने २०१९ मध्ये JKLF वर बंदी घातली होती

फुटीरतावादी नेता यासिन मलिकवर केंद्राने २०१९ मध्ये JKLF वर बंदी घातली होती. मलिकवर १९९० मध्ये हवाई दलाच्या चार जवानांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मलिकसह ६ जणांवर आरोपही निश्चित करण्यात आले आहेत. २५ जानेवारी १९९० रोजी हवाई दलाच्या जवानांवर हल्ला झाला होता. त्यानंतर हे सैनिक श्रीनगरच्या विमानतळावर जाण्यासाठी बसची वाट पाहत होते. यासीन मलिकने (Yasin Malik) हा कट रचला होता, असा आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण आणि दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप मलिकवर आहे. यासीन मलिकसह आणखी २४ लोकांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com