FIFA WC 2022 : फुटबॉलमुळे जगावर आणखी एका संसर्गजन्य आजाराचं संकट? 'कॅमल फ्लू'बाबत WHO ने केलं सावध

कतारमध्ये कॅमल फ्लू वाढला तर तो कोरोनासारख्या साथीचे रूप घेण्याची भीतीही व्यक्ती केली जात आहे.
Camel Flu
Camel FluSaam TV

कतार : कोरोना, त्यानंतर मंकीपॉक्स या दोन्ही संकटातून अवघं हळूहळू सावरतंय. सगळं काही पूर्ववत होतंय. जगातील कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळे स्पोर्टमधील सर्वात मोठा इव्हेंट फिफा वर्ल्ड कप कतारमध्ये पार पडते आहे. जगभरातील फूटबॉलप्रेमी मोठ्या उत्साहात कतारमध्ये पोहोचले आहेत. मात्र यामुळे अवघ्या जगाला पुन्हा एकदा मोठ्या संकटाचा धोका निर्माण झाला आहे.

फुटबॉल प्रेमींची आवडती स्पर्धा FIFA वर्ल्ड कप 2022 (FIFA World Cup 2022) ला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये ही स्पर्धा सुरू झालीय आहे. दरम्यान, एका अहवालात कतारमध्ये कॅमल फ्लू किंवा रेस्पिरेटरी सिंड्रोम एमईआरएस आजार पसरण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Camel Flu
FIFA WC 2022: बेल्जियमच्या पराभवामुळे फॅन्सची सटकली; रस्त्यावर उतरुन राडा, अनेक ठिकाणी दंगलसदृश परिस्थिती

याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चिंता व्यक्त केली आहे. डब्ल्यूएचओच्या तज्ञांच्या मते, कॅमल फ्लू किंवा रेस्पिरेटरी सिंड्रोम एमईआरएस नावाचा एक प्राणघातक आजार मध्य पूर्वमध्ये पसरू शकतो. यासोबतच हा फ्लू कतारपासून संपूर्ण जगात पसरु शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत कतारमध्ये कॅमल फ्लू वाढला तर तो कोरोनासारख्या साथीचे रूप घेण्याची भीतीही व्यक्ती केली जात आहे.

न्यू मायक्रोब्स अँड न्यू इन्फेक्शन जनरलच्या अहवालात असे म्हटले आहे की कोराना आणि मंकीपॉक्स सारख्या संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. परंतु कतारमध्ये फिफा विश्वचषक आयोजित केला जात आहे, ज्यामध्ये लाखो लोक सहभागी होतील. अशा परिस्थितीत, कतारमध्ये कॅमल फ्लूचा धोका वाढू शकतो आणि हा संसर्ग एका देशातून इतर देशांमध्ये पसरू शकतो.

Camel Flu
Ruturaj Gaikwad: कस्सं कायssss ! एका षटकात ७ षटकार; मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची विस्फोटक खेळी, VIDEO पाहा

मोठ्या संख्येने लोक एकत्र जमल्यामुळे हा विषाणू वेगाने पसरतो. 22 नोव्हेंबर रोजी न्यू मायक्रोब्स अँड न्यू इन्फेक्शन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालात कतारमधून कॅमल फ्लू पसरण्याचा धोका असल्याची स्पष्ट भीती व्यक्त करण्यात आली आहे.

कॅमल फ्लू म्हणजे काय?

कॅमल फ्लू हा एक प्रकारचा विषाणू आहे जो उंटांपासून मानवांमध्ये पसरतो. आखाती देशांमध्ये उंटांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. म्हणूनच या देशांतून कॅमल फ्लू पसरण्याचा धोका खूप जास्त आहे.

कतारमध्ये कॅमल फ्लूचे प्रमाण वाढल्यास कतार या आजाराचा सामना करण्यास तयार आहे का, अशीही चिंता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. इतकेच नाही तर कॅमल फ्लूसोबतच इतर आजार पसरण्याचा धोकाही या अहवालात सांगण्यात आला आहे. ज्यामध्ये मलेरिया, डेंग्यू, रेबीज, गोवर, हेपेटायटीस ए आणि बी यांचा समावेश आहे.

कतारला गेलेल्या लोकांसाठी सल्ला

WHOने अॅडव्हायझरीही जारी केली आहे, ज्यामध्ये टूर्नामेंट पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांनी उंटांना हात लावू नये आणि त्यांच्या जवळ जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.

कॅमल फ्लूची लक्षणे

कॅमल फ्लूची लक्षणेही सांगण्यात आली आहेत. ज्यामध्ये श्वास घेण्यास त्रास होणे, ताप, खोकला आणि अतिसार यासारख्या समस्या असू शकतात. यासोबतच वृद्ध, किडनीचे रुग्ण, कॅन्सरचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण अशा व्यक्तींना या आजाराचा धोका अधिक असतो. तसेच ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनीही जास्त काळजी घेण्याची गरज आहे.

Edit By- Pravin Wakchoure

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com