
Karnataka New CM: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दणदणीत विजयानंतर राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
मुख्यमंत्री निवडीसाठी आज कर्नाटकमध्ये विधानसभा पक्षाची बैठकही होणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पक्षाचे नेते जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची कर्नाटकातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (CLP) नेत्याची निवड करण्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी माहिती दिली की, सीएलपी बैठकीचे निरीक्षण केंद्रीय पर्यवेक्षण करतील. त्यांनी ट्वीट केले आहे की, "आदरणीय काँग्रेस अध्यक्षांनी सुशील कुमार शिंदे (माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र), जितेंद्र सिंह (पक्ष सरचिटणीस) आणि दीपक बाबरिया (माजी सरचिटणीस) यांची विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे." (Latest Marathi News)
भारतीय जनता पक्षाचा एकमेव दक्षिणेकडील बालेकिल्ला असलेल्या कर्नाटकमध्ये मोठा प्रभाव झाला आहे. यातच आज कर्नाटकमध्ये मोठा विजय मिळवलेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाची संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार असून, त्यामध्ये नेत्याच्या निवडीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
135 जागांवर काँग्रेसचा विजय
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्याच्या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या मतांच्या टक्केवारीत चार टक्क्यांहून अधिक वाढ केली. काँग्रेसने 135 जागांवर विजय मिळवला. 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेसाठी शनिवारी झालेल्या मतमोजणीत काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 113 जागा मिळवल्या आहेत.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेसच्या मतांमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर जनता दलाच्या (सेक्युलर) मतांमध्ये पाच टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. 2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसला 38.04 टक्के मते मिळाली. त्यानंतर भारतीय जनता पक्ष (BJP) 36.22 टक्के आणि JD (S) 18.36 टक्के मते मिळवली होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.