BJP News : भाजपने जे.पी नड्डांना पुन्हा अध्यक्ष का केलं? समोर आली मोठी कारणं...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नड्डा यांच्या मुदतवाढीसंदर्भात प्रस्ताव मांडला.
j.P Nadda, Amit Shah
j.P Nadda, Amit ShahSaam TV

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकार्णीची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत २०२३ मध्ये होणाऱ्या १० राज्यातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. याव्यतिरिक्त २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवरही मंथन झाले. या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. भाजप आगामी २०२४ लोकसभेची निवडणूक पक्षाचे विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याच अध्यक्षतेखाली लढवणार आहे. म्हणजेच काय तर नड्डा यांना १ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे जे.पी. नड्डा हे लालकृष्ण आडवाणी आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा भाजपचे अध्यक्ष होणारे ते तिसरे व्यक्ती ठरले आहेत. जे.पी नड्डा यांना जून २०१९ मध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. यानंतर २० जानेवारी २०२० रोजी त्यांना पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्यात आलं होतं.

आता येत्या २० जानेवारीला नड्डा यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे पुढील १ वर्षासाठी नड्डा यांना पुन्हा भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री तसेच भाजप नेते अमित शाह यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यांनी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नड्डा यांच्या मुदतवाढीसंदर्भात प्रस्ताव मांडला.

नड्डा यांना पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष का केलं?

- कोविडच्या काळात नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी लोकांची सेवा केली.

- बिहार, महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तप्रदेशात जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले.

- बंगालमध्ये भाजपच्या जागा ३ वरून ७७ इतक्या झाल्याने दक्षिणेत पक्षाची ताकद वाढली

- जे.पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपला प्रथमच गोव्यात पूर्ण बहुमत मिळाले.

- याव्यतिरिक्त गुजरात विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजपने दणदणीत विजय मिळाला.

- जेपी नड्डा यांनी विविध राज्यांमध्ये पक्षाचा विस्तार केला.

- जम्मू-काश्मीरच्या बीडीसी निवडणुकीत भाजपला यश मिळाले

- जेपी नड्डा यांनी बूथ सक्षमीकरण, लोकसभा स्थलांतर योजना, घरोघरी तिरंगा कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली.

- जे.पी. नड्डा यांनी मन की बात हा लोकांचा कार्यक्रम बनवला, देशभरात विजय संकल्प सभा घेतल्या, अपना बूथ सबसे शक्ती कार्यक्रम यशस्वीपणे राबवला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com