BrijBhushan Singh News: एकीकडे पैलवानांचा आक्रोश, मात्र गंभीर आरोप असणाऱ्या ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई का नाही?

BrijBhushan Singh News : ब्रिजभूषण यांना भाजपची गरज आहे की भाजपला त्यांची गरज आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan SinghSaam tv

Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप कुस्तीपटूंनी केले आहेत. ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन FIR दाखल करण्यात आले आहेत.मात्र ब्रिजभूषण यांना अटक होत नाही तोवर आंदोलन संपवणार नाही अशी भूमिका कुस्तीपटूंनी घेतली होती.

आंदोलन केल्याप्रकरणी विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया या तिघांविरोधात दिल्ली पोलिसांना गुन्हा दाखल केले आहेत. याशिवाय कुस्तीपटून मोठ्या कष्टाने जिंकलेले मेडल्सही गंगेत विसर्जित करण्याचा इशारा दिला आहे. एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना देखील खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. यावरुन ब्रिजभूषण यांना भाजपची गरज आहे की भाजपला त्यांची गरज आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्रिजभूषण यांना अटक का होत नाही?

सूत्रांच्या माहितीनुसार ब्रिजभूषण यांना अटक करण्यासाठी पुरेसे पुरावे मिळाले नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. जिथं छेडछाडीचे आरोप आहेत तिथे पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलिसांनी कुठलेही फोटो, सीसीटीव्ही किंवा साक्षीदार मिळाले नसल्याचा दावा केला आहे.

Brij Bhushan Sharan Singh
Rahul Gandhi News : अमेरिकेतील कार्यक्रमात अँकरकडून 'माजी खासदार' म्हणून ओळख, त्यावर राहुल गांधीची उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाले...

ब्रिजभूषण यांची ताकद

ब्रिजभूषण सिंह रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे मागील 12 वर्षांपासून अध्यक्ष आहेत. तब्बल सहा वेळा ते खासदार म्हणून निवडून आलेत. ब्रिजभूषण यांना उत्तर प्रदेशच्या राजकारणातले बाहूबली म्हणून ओळखलं जातं.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा तेथील राजकारणातला बोलबाला आहे. पण असं असतानाही ब्रिजभूषण सिंह यांनी अनेकवेळा योगींचा विरोध केलाय. खासदार असणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांनी अनेकवेळा उघडपणे योगींवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

कमळ चिन्ह उधार घेतात

अनेक राजकीय जाणकार सांगतात की, ब्रिजभूषण हे निवडणुकीच्या काळात  भाजपचं कमळ चिन्ह केवळ उधार घेतात आणि स्वत:च्या ताकदीवर जिंकतात. इतका त्यांचा उत्तरप्रदेशात बोलबाला आहे. समजा भाजपने त्यांना दुखावलंच तर भाजपचा कमीत कमी आर्धा डजन लोकसभा मतदारसंघातून सुपडा साफ होऊ शकतो, इतकी ताकद ब्रिजभूषण यांची आहे.

Brij Bhushan Sharan Singh
Amit Shah News : अमित शहांचा कडक शब्दांत इशारा; म्हणाले, मणिपूरमध्ये हिंसा घडवून आणणाऱ्यांना सोडणार नाही!

राजकीय कारकीर्द

ब्रिजभूषण यांनी महाविद्यालयीन जीवनातच राजकारणात एंन्ट्री केली. बाबरी प्रकरणातही त्यांचं नाव आरोपी म्हणून समोर आलं होतं. यामुळे त्यांची "हिंदुत्ववादी प्रतीमा" उजळून निघाली. पुढे 2020 मध्ये त्यांची इतरांसोबत निर्दोष मुक्तता करण्यात आली. ब्रिजभूषण सिंह हे गोंडा, बलरामपूर आणि कैसरगंज येथून सहा वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. 1991 मध्ये त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत ते सलग विजयी झाले.

आपल्या मतदारसंघाच्या बाहेरही त्यांच्या शिक्षण संस्थांचं जाळं पसरलं आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचा निर्विवाद दबदबा आहे. त्यांच्या पत्नी माजी खासदार आहेत. त्यांच्या दोन हयात असलेल्या मुलांपैकी एक आमदार आहे.

Brij Bhushan Sharan Singh
Beed News: आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या समाजकंटकाला अटक करा; बीडमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

गुन्हेगारी वर्तुळाशी जवळीक

बृजभूषण यांचा गुन्हेगारी वर्तुळाशीही जवळचा संबध आहे. 1996 मध्ये त्यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांना आश्रय दिल्याचा आरोप होता. या प्रकरणात (टाडा) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगातही टाकण्यात आलं होतं.

तुरुंगात असताना,अटलबिहारी वाजपेयी यांनी पत्र लिहून त्यांना संयम ठेवायला सांगितलं होतं. नंतर पुराव्याअभावी या खटल्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यावरून त्यांना भाजपची नाही तर भाजपला त्यांची जास्त गरज असल्याचं सांगण्यात येतं. म्हणून आता कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून भाजप त्यांच्याविरोधात काय भूमिका घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com