DK Shivakumar Reaction : मुख्यमंत्रिपदाची संधी हुकली, शिवकुमार यांच्या मनातलं आलं ओठांवर; अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय!

DK Shivakumar : मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले शिवकुमार यांची संधी हुकल्याने ते नाराज आहेत, अशी जोरदार चर्चा होती.
D. K. Shivakumar
D. K. Shivakumarsaam tv

DK Shivakumar Vs Siddaramaiah : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने काँग्रेसच्या बाजूने स्पष्ट कौल दिल्यानंतर मुख्यमंत्रिपद कुणाला? असा पेच निर्माण झाला होता. तो पेच सुटला असून, सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री, तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली.

मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले शिवकुमार यांची संधी हुकल्याने ते नाराज आहेत, अशी जोरदार चर्चा होती. पण स्वतः शिवकुमार यांनी माध्यमांसमोर या चर्चेला पूर्णविराम दिला. (Latest Marathi News)

D. K. Shivakumar
Siddaramaiah Vs Shivakumar: ७५ वर्षांचे सिद्धरामय्या शिवकुमारांवर पडले 'भारी'!, जाणून घ्या खास ५ गोष्टी

कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण? यावर गेल्या तीन-चार दिवसांपासून खलबतं सुरू होती. काँग्रेस हायकमांडपासून ते महत्वाच्या नेत्यांपर्यंत जोरबैठका सुरू होत्या. सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी 'शर्यत' सुरू होती. अखेर मुख्यमंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्यांना झुकते माप दिले. तर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपद दिले आहे. (Political News)

D. K. Shivakumar
Karnataka New Cm : कर्नाटकचा राजकीय पेच सुटला; सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री

काय म्हणाले शिवकुमार? (व्हिडिओ)

काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्रिपदाची संधी हुकल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु, यावर आता स्वतः शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही तडजोड केली आहे किंवा आनंदी आहात का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवकुमार यांना विचारला. त्यावर मी कशाला नाराज होऊ? असा प्रतिप्रश्न करून चर्चेला पूर्णविराम दिला.

जेव्हा जनता तुम्हाला मोठा कौल देते, तर नक्कीच आम्ही आनंदी असायला हवं आणि जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करायला हवीत. हाच आमचा प्रमुख उद्देश आणि अजेंडा आहे. मी कशाला नाराज असेल? अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असं शिवकुमार यांनी सांगितलं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com