Madhya Pradesh : पत्नी आणि मुलीची केली हत्या; घरातचं पुरले मृतदेह, धक्कादायक घटनेने मध्य प्रदेश हादरलं

घरात त्याने तिघांवर कुऱ्हाडीने वार केले तसेच मृतदेह घरामध्येच खड्डा खणून त्यांना पुरून टाकले आहे.
Madhya Pradesh
Madhya Pradesh Saam tv

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमध्ये गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र वाढतच चालले आहे. सातत्याने भयावह पद्धतीच्या गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. मध्य प्रदेशात एका नराधमाने आपल्या पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली आहे. राहत्या घरात त्याने तिघांवर कुऱ्हाडीने वार केले तसेच मृतदेह घरामध्येच खड्डा खणून त्यांना पुरून टाकले आहे. सदर घटनेत आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या रतलमयेथील दिदीनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आपोरी ३३ वर्षीय असून तो रेल्वेमध्ये गॅंगमन म्हणून नोकरी करतो. सदर घटनेत अधिक तपास करत पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. चौकशी दरम्यान या कामात त्याच्याबरोबर आणखीन एकाने त्याला मदत केल्याचे समजले असून त्या व्यक्तीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने मृतदेह घरामध्येच पुरल्याचे समजले होते. त्यामुळे खोदकाम करत पोलिसांनी त्या व्यक्तीची पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सदर घटनेत पतीने आपली पत्नी आणि मुलं बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. त्यानंतर तपासात पोलिसांना पतीवर संशय आला. चौकशीमध्ये सर्व प्रकरण समोर आले. व्यक्तीगत कारणाने हत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Madhya Pradesh
Kolhapur Crime : कोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई; बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या ९ जणांना ठोकल्या बेड्या

उत्तर प्रदेशमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत चक्क एका पोलीस इस्पेक्टर पित्याने आपल्या पत्नीला आणि मुलीला अमानुष वागणूक दिली आहे. बापाच्या या जाचाला कंटाळून मुलीने शनिवारी तेथून पळ काढला. पित्याच्या तावडीतून सुटून तिने थेट पोलिस स्टेशन गाठलं आहे. माझे पापा मला खूप त्रास देतात.

Madhya Pradesh
Crime News : मुलीला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत बघितलं; वडिलांनी केलं भयंकर कृत्य

मला त्यांच्याबरोबर रहावं वाटत नाही. ते मला मारत असताना मम्मी मला वाचवण्यासाठी आली की, ते तिला देखील खूप मारहाण करतात. असे या मुलीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. मुलीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिला आपल्या निगराणीवर सखी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवलं आहे. सोमवारी मुलगी आणि तिच्या आईचा जबाब नोंदवला जाणार आहे. तसेच पित्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com