
कानपूर : उत्तरप्रदेशच्या कानपूरमधील पती-पत्नी आणि प्रेयसी यांची भररत्यातील भांडणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पत्नीला घरी सोडून प्रेयसीला दुचाकीवर घेऊन फिरणे व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. प्रेयसीला दुचाकीवरून फिरवत असताना पत्नीने रस्त्यात गाठले. त्यानंतर महिलेने स्वत:च्या पतीला चांगलीच अद्दल घडवली आहे. यावेळी उपस्थित लोकांनी भांडणाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियाावर व्हायरल केला आहे. पत्नी पतीला लोकांसमोर मारतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ (viral video) समोर आल्याने शहरात या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. भांडणावेळी उपस्थित लोकांनी हा क्षण मोबाइलमध्ये कैद करत सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल केला आहे.
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरचा विवाहीत व्यक्ती प्रेयसीसोबत दुचाकीवरून फिरत होता. सदर व्यक्तीची पत्नी देखील त्याच्यावर बारीक लक्ष देऊन होती. महिलेने पतीच्या विरोधात अनेक पुरावे गोळा केले होते. पतीच्या विरोधात पुरावे जमा करण्याबरोबर पत्नीने अनेक साक्षीदार देखील जमा केले. पती विरोधात भक्कम पुरावे जमा केल्यानंतर पतीला रंगेहाथ पकडणेच बाकी होते. त्याचदरम्यान, पती त्याच्या प्रेयसीसोबत रस्त्यावरून दुचाकीवर फिरत असताना महिलेने रंगेहाथ पकडत चांगलाच धडा शिकवला आहे. महिलेने भररस्त्यात दुर्गेचे रुप धारण करत पतीची चांगलीच धुलाई केली आहे. महिलेने पतीच्या कानशिलात लगावताना अजिबात मागचा पुढचा विचार केला नाही. भररत्यात महिलेने पतीला चांगला धडा शिकवला आहे. तसेच पतीच्या प्रेयसीला देखील महिलेने लोकांसमोर चांगलाच चोप दिला आहे.
दरम्यान, पतीला त्याच्या पत्नीच्या रागाचा सामना करताना चांगलाच मार मिळाला आहे. पतीची धुलाई सुरू असताना उपस्थित लोक भांडण न सोडवता मोबाइलमध्ये व्हिडीओ काढण्यातच मश्गुल होते. लोकांनी भांडणे न सोडवताना व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. जोरदार भांडणे झाल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी पतीला पोलीस ठाण्यात पतीला नेण्यास सांगितले. काही वेळानंतर उपस्थित लोकांनी महिलेला पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. पोलिसांकडे प्रकरण गेल्यावर त्यांनी संबंधित प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Edited By - Vishal Gangurde
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.