पतीच्या निधनानंतर सर्वांना सांगून पत्नीची आत्महत्या; एकत्र निघाली दोघांची अंत्ययात्रा

डॉक्टर पतीच्या मृत्यूच्या एका तासानंतर सहायक प्राध्यापक असलेल्या पत्नीने आत्महत्या केली आहे.
पतीच्या निधनानंतर सर्वांना सांगून पत्नीची आत्महत्या; एकत्र निघाली दोघांची अंत्ययात्रा
DeathSaam TV

मध्य प्रदेश : 'पतीचा मृत्यू झाला आता आपण तरी जगून करायचं तरी काय?' असं म्हणत एका महिलेने पतीच्या मृत्यूनंतर एका तासातच स्वत:च आयुष्य संपवल्याची ह्रदयद्रावक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. डॉक्टर पतीच्या मृत्यूच्या एका तासानंतर सहायक प्राध्यापक असलेल्या पत्नीने आत्महत्या केली आहे. चूना भट्टी भागात राहणाऱ्या ४७ वर्षीय डॉक्टर पराग पाठक हे भाभा मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर होते.

२८ एप्रिलला सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनालगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. चेकअप केल्यानंतर पराग पाठक यांची तब्यत ब्रेन हॅमरेजमुळे बिघडली असल्याचं समजलं त्यामुळे त्यांची सर्जरी करण्यात आली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं मात्र २ मे रोजी रात्री डॉक्टर पराग यांचं निधन झालं.

डॉक्टरांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी प्रीति झारिया यांना मोठा धक्का बसला. तो धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यांनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉक्टरांना आपल्या पतीचा मृत्यू झाला असून माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही, या जगात आता माझं कुणीही राहिलेलं नाही त्यामुळे आपण आत्महत्या करायला जात आहे असं त्या बोलू लागल्या आणि अचानक त्या कार घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडल्या.

Death
Koffee With Karan: बॉलिवूडचे गॉसिप राहणार गुपितच! करण जोहरचा भावनिक पोस्ट लिहून खुलासा

दरम्यान, प्रीति यांचा भाऊ हॉस्पिटलमध्ये पोहोचला असता डॉक्टरांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि त्यामुळे ते लगेच आपल्या बहिणीचा पाठलाग करत गेले मात्र तो पर्यंत प्रीति यांनी एका वॉटरफॉलवरून उडी मारली होती. दरम्यान या सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर प्रिती यांचा मृतदेह काढून तो शवविच्छेदनानंतर डॉक्टर पत्नी-पतीची अंत्ययात्रा एकत्र काढण्यात आली. जबलपूरच्या राहणाऱ्या प्रीति भोपाळच्या नरेला कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर होत्या. चार वर्षाआधी त्यांचं लग्न झालं होतं.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.