धक्कादायक! पतीच्या टोमण्याला पत्नी कंटाळली; केले 'हे' भयंकर कृत्य

Uttar Pradesh Crime News : या घटनेने उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक! पतीच्या टोमण्याला पत्नी कंटाळली; केले 'हे' भयंकर कृत्य
wife cut tongue cut of husband after dispute in uttar pradeshSaam Tv

बरेली : उत्तर प्रदेशमधील युवकाने मोठ्या आनंदात बिहारमध्ये एका दिव्यांग युवतीशी एका वर्षापूर्वी विवाह केला. मात्र, या जोडप्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. काही महिन्यात युवकाकडून पत्नीला (Wife) टोमणे मारणे सुरु झाले. रोजच्या टोमण्याला कंटाळलेल्या महिलेने पतीला जोरदार झटका दिला. या दिव्यांग महिलेने थेट रागाच्या भरात स्वत:च्या पतीची जीभच कापली आहे. या घटनेने उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे महिलेच्या पतीची तब्येत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. (wife cut tongue cut of husband after dispute in uttar pradesh)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाल मौर्य यांनी एक वर्षापूर्वी एका दिव्यांग युवतीशी विवाह केला होता. हे जोडपे शीशगड क्षेत्रातील बल्ली गावात राहत होते. दोघांचा संसार गुण्यागोविंदाने सुरु झाला. श्रीपाल यांची पत्नी जन्मापासून बोलू शकत नव्हती. विवाह झाल्यानंतर पुढच्या काही महिन्यांनी दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली. दोघांमध्ये वाद झाल्यावर श्रीपाल पत्नीला तिच्या दिव्यांगपणावर टोमणे मारायला सुरुवात करायचा. त्यामुळे पत्नीला श्रीपालचा प्रचंड राग यायचा. पत्नी श्रीपालच्या टोमणे मारण्याच्या सवयीमुळे वैतागून गेली होती. तिच्या मनात श्रीपालच्या विषयी राग दिवसेंदिवस वाढत चालला होता. श्रीपालच राग मनात धरून त्याची दिव्यांग पत्नी घराच्या कोपऱ्यात बसली होती.

wife cut tongue cut of husband after dispute in uttar pradesh
मध्‍यप्रदेशातून यायचा गाडी चोरीला; चार गाड्यांसह आरोपी ताब्‍यात

बुधवारी संध्याकाळी श्रीपाल मजुरी करून थकल्याने संध्याकाळी घरी येऊन लवकर झोपी गेला. त्यादरम्यान झोपी गेलेल्या पतीची चिडलेल्या पत्नीने दातांनी त्याची जीभच छाटली. (Crime News) श्रीपाल पत्नीच्या या भयंकर कृत्याने रक्तबंबाळ झाला. त्यानंतर त्याची आरडोओरड सुरू झाली. त्याच्या मोठ्या आवाजाने शेजारी लोक घराजवळ पोचली. त्याचा घरा शेजारील त्याच्या मदतीसाठी धावले. उपस्थित लोकांनी श्रीपालला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या श्रीपालची स्थिती चिंताजनक असल्याची सांगितली जात आहे. दिव्यांग पत्नीचे हे भयंकर कृत्य संपूर्ण बल्ली गावात चर्चेचा विषय झाला आहे. तसेच उत्तरप्रदेशच्या बरेलीमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, सदर प्रकरणाची तक्रार अद्याप पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नाही.

Edited By - Vishal Gangurde

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.