Wife Exchange Racket: बायकांची अदला-बदली; अय्याशीचा मांडला होता खेळ

अजूनही अनेक लोक पोलिसांच्या रडारवर आहेत. एका महिलेने पतीविरोधात तक्रार केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे.
Wife Exchange Racket: बायकांची अदला-बदली; अय्याशीचा मांडला होता खेळ
Wife Exchange Racket: बायकांची अदला-बदली; अय्याशीचा मांडला होता खेळSaam TV

नवी दिल्ली: मोठी लोक, मोठ्या गोष्टी! पण या हायफाय लोकांच्या आत छंद कसे फुलतात? स्वत:ला उच्चभ्रू म्हणवून घेण्यासाठी ते आपल्या पत्नीलाही गलिच्छ काम करायला लावतात. केरळमध्येही अशाच प्रकारचा भंडाफोड झाला आहे. हे लोक आपल्या बायकांची देवाणघेवाण करायचे. यासाठी त्यांचा एक ग्रुप होता ज्याच्या आधारे ते हे काम करायचे. केरळ पोलिसांनी (Keral Police) कोट्टायम येथून या कृत्याशी संबंधित ७ जणांना अटक केली आहे. (Kerala Wife Exchange Racket)

Wife Exchange Racket: बायकांची अदला-बदली; अय्याशीचा मांडला होता खेळ
Beed: 'मला रिव्हॉल्व्हर द्या' म्हणणाऱ्या अधिकाऱ्याची पालकमंत्र्यांनी घेतली दखल

अजूनही अनेक लोक पोलिसांच्या रडारवर आहेत. एका महिलेने पतीविरोधात तक्रार केल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. महिलेचा आरोप आहे की, तिचा पती दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता. यापूर्वीही कायमकुलम येथून अशीच एक घटना समोर आली होती. कोट्टायममध्ये एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली की तिचा पती तिला दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत पती आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे. या अटकेनंतर पोलिसांना 'वाईफ एक्सचेंज रॅकेट'ची माहिती दिली. ज्यामध्ये पुरुष त्यांच्या पत्नींची देवाणघेवाण करत आहेत.

केरळमध्ये पती पत्नी एक्सचेंज रॅकेटमध्ये हजाराहून अधिक लोक सामील आहेत, ज्यामध्ये शारीरिक संबंधांसाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण केली जात असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी चंगनाचेरीचे डेप्युटी एसपी आर श्रीकुमार म्हणाले- "आधी ते टेलिग्राम आणि मेसेंजर ग्रुपमध्ये सामील होतात आणि नंतर एकमेकांना भेटतात. आम्ही तक्रारदाराच्या पतीला अटक केली आहे. यामागे एक मोठे रॅकेट आहे आणि आम्ही त्याचा तपास करत आहोत. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून जे पकडले गेले ते अलाप्पुझा, कोट्टायम आणि एर्नाकुलम येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com