दिवसाढवळ्या पेट्रोल ओतून पतीला पेटवलं अन् मग दगडानं ठेचून हत्या !
दिवसाढवळ्या पेट्रोल ओतून पतीला पेटवलं अन् मग दगडानं ठेचून हत्या !Saam Tv

दिवसाढवळ्या पेट्रोल ओतून पतीला पेटवलं अन् मग दगडानं ठेचून हत्या !

खुनाची एक हैराण करून टाकणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. बेंगलोर येथे एका महिलेने दिवसाढवळ्या आपल्या पतीला पेटवून दिले.

बंगळुरू : खुनाची एक हैराण करून टाकणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. बेंगलोर येथे एका महिलेने दिवसाढवळ्या आपल्या पतीला पेटवून दिले. एवढेच नाही तर यानंतर दगडाने ठेचून पत्नीची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कर्नाटकच्या Karnataka तुमकूर येथील आहे.

हे देखील पहा-

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मृत व्यक्तीचे नाव नारायण आहे. खून केलेल्या पत्नीचे नाव अन्नपूर्णा आहे. पत्नीने तिच्या पतीवर पेट्रोल ओतून पेटवून दिले. एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने एक मोठा दगड तिच्या पतीच्या डोक्यात घातला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

आग लावल्यानंतर पतीने मदत मागण्यासाठी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बाहेर पडू शकला नाही. यानंतर पत्नीनं त्याला नाल्यात ढकललं आणि मग डोक्यात मोठा दगड Stone घातला.

दिवसाढवळ्या पेट्रोल ओतून पतीला पेटवलं अन् मग दगडानं ठेचून हत्या !
धक्कादायक! जेवण देत नसल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे तिच्या शेजाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध ठेवले होते. त्यामुळे याच कारणामुळे पती-पत्नीमध्ये मागील अनेक वर्षांपासून सतत भांडणं होत असे. तर त्या आरोपी पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्यानंतर स्वतःच पोलिसांकडे सरेंडर केलं. तिने आपल्या गुन्हा पोलिसांकडे मान्य केला. आरोपी महिलेनं म्हटले की, ती आपल्या पतीचा त्रास आणखी सहन करू शकत नव्हती. या कारणाने तिने तिच्या पतीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी महिलेच्या शेजाऱ्यालाही अटक केली आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com