Bhopal Crime News : सोमवारची रात्र नवऱ्यासाठी ठरली भयानक; १०० रुपये मागितल्यानं बायकोनं दिलं पेटवून

Bhopal Crime News: मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये धक्कादायक घटना घडली.
Bhopal Crime News
Bhopal Crime NewsSaam Tv

Husband - wife Quarrel :

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये धक्कादायक घटना घडली. फक्त १०० रुपये मागितले म्हणून बायकोने तिच्या नवऱ्याला पेटवून दिले. कोटमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनमारी गावात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. अनुपूर जिल्ह्यातील मनमारी गावात नवरा-बायकोमध्ये वाद झाला. वादाची ठिणगी इतकी पेटली की, बायकोने रागाच्या भरात त्याला पेटवून दिलं. फक्त १०० रुपये मागितले म्हणून बायकोने दुचाकीतील पेट्रोल काढून ते अंगावर ओतले. त्यानंतर पेटवून दिले, असा आरोप पीडित पतीने केला आहे. (Latest Crime News)

या घटनेत अंगद प्रसाद चौधरी (वय ३२) हा गंभीररित्या भाजला आहे. घटनेनंतर तात्काळ त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. या घटनेबाबत संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मिळाली. जखमी तरूण रुग्णालयात दाखल आहे. त्याचा जबाब नोंदवला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घटनेत ट्विस्ट

बायकोकडं १०० रुपये मागितले म्हणून तिनं दुचाकीतील पेट्रोल अंगावर ओतून पेटवून दिले, असा आरोप ३२ वर्षीय तरुणाने केला आहे. या आरोपांची सत्यता तपासून बघत आहोत. त्याच्या बायकोचा जबाबही नोंदवून घेतला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जखमी तरुणाला दारूचे व्यसन आहे. त्यानं पत्नीकडे दारुसाठी पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर त्याने स्वतःच पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेतले, असा दावा त्याच्या बायकोने केला आहे.

Bhopal Crime News
Nanded Crime News: गरोदर पत्नीसह चार वर्षीय मुलीची झोपेतच हत्या; सैन्यदलात कार्यरत पतीचे कृत्य, आरोपी पती स्वतःच गेला पोलिसात

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com