अनैतिक संबंधांच्या संशयावरुन पत्नीला खांबाला बांधून मारहाण

तीन मुलांच्या आईवर प्रेमसंबंधाचा आरोप करुन पतीने पत्नीला लाईटच्या खांबाला बांधून मारहाण केली आहे.
अनैतिक संबंधांच्या संशयावरुन पत्नीला खांबाला बांधून मारहाण
Wife tied to a pole and beaten on suspicion of having an affair in bihaSaam Tv

पटना: अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीला वीजेच्या खांबाला बांधून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमधील रोहतासमधील चेनारी भागातील सिंहपूर गावात घडली आहे. या महिलेला तीन मुले आहेत. तिच्या पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीला मारहाण केली. हे प्रकरण पोलीस (Police) ठाण्यात गेल्यानंतर दोन्ही बाजू ऐकून पोलिसांनी प्रकरण मिटवले आहे.

Wife tied to a pole and beaten on suspicion of having an affair in biha
रस्त्याच्या कामासाठी भाजप-सेनेच्या आमदारांची शिफारस; गुन्हा पालकमंत्र्यावर

याप्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी (Police) महिलेचा पती दीपक राम, सासरा शिवपूजन राम यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. महिलेवर अत्याचार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच. पोलीस ताफ्यासह दाखल झाले आणि महिलेची सुटका केली. महिलेला गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत दारात असलेल्या विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, एका महिलेला खांबाला बांधून मारहाण होत असल्याची माहिती मिळाली. त्वरित कारवाई करत महिलेची यातून सुटका करण्यात आली. या प्रकरणात दीपक राम, शिवपूजन राम, केदार राम, धीरेंद्र राम आणि नरेंद्र राम यांचा समावेश आहे. या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर या घटनेतील अन्य आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.