Same-Sex Marriage : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळणार? आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात आज समलैगिंक विवाहाला कायदेशीर परवानगी मागणाऱ्या याचिकांवर सुनावणी
Supreme Court of India
Supreme Court of IndiaSaam TV

Same Sex Marriage News : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकेत समलिंगी विवाहाला विशेष विवाह कायद्यांतर्गत आणण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे.

Supreme Court of India
Bharat Jodo Yatra : तीच चाल, तीच स्टाइल...भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसारखा हुबेहुब दिसणारा 'तो' तरूण कोण?

मात्र, भारतीय कायद्यानुसार समलैगिंक व्यक्तींना लग्नाची परवानगी नाही. या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्याला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.

Supreme Court of India
Video : विरुद्ध दिशेने लोकल पकडताना आली एक्सप्रेस, जीव जाणारच तितक्यात...

कोण आहेत याचिकाकर्ते?

पश्चिम बंगाल चे सुप्रियो चक्रवर्ती आणि दिल्लीचे अभय डांग यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे. हे दोघंही10 वर्षापासून सोबत राहतात. डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी हैदराबाद इथं लग्न केलं आहे. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या विवाहाला स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली परवानगी द्यावी.

दूसरी याचिका पार्थ फिरोज मेहरोत्रा आणि उदय राज यांची आहे. हे दोघंही 17 वर्षापासून सोबत राहत आहे. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता नसल्यानं संपत्तीच्या अधिकारासह, समलैंगिक विवाह करणाऱ्या व्यक्तींना मुल दत्तक घेता येत नाही. तसंच सरकारच्या इतर अनेक महत्त्वाच्या योजनांपासून ते वंचित राहतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com