सुन भांडू नये म्हणून सासरच्यांनी तिला पाठवले मांत्रिकाकडे, ७९ दिवस करत होता अत्याचार

एका बंद खोलीतून महिलेची आणि तिच्या अडीच वर्षाच्या मुलाची पोलिसांनी सुटका केली आहे.
सुन भांडू नये म्हणून सासरच्यांनी तिला पाठवले मांत्रिकाकडे, ७९ दिवस करत होता अत्याचार
Odisha rapeSaam Tv

भुवनेश्वर : आपण एखाद्यावर जास्त विश्वास ठेवला तर तो अंधविश्वास ठरु शकतो. या विश्वासाचा काही लोक फायदा घेत असतात. अशीच एक घटना ओडिशातून समोर आली आहे. वैवाहिक वाद मिटवण्याच्या बहाण्याने एका मांत्रिकाने सुनेवर ७९ दिवस बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका बंद खोलीतून महिलेची आणि तिच्या अडीच वर्षाच्या मुलाची पोलिसांनी (Police) सुटका केली आहे.

पोलिसांना (Police) चकवा देवून मांत्रिक पळून गेला आहे. या महिलेने पती आणि सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. सासरच्यांनीच या महिलेला मांत्रिकाकडे पाठवले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

हे देखील पाहा

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या महिलेचे लग्न २०१७ मध्ये झाले होते. लग्नानंतर महिलेला हुंड्यासाठी सासरच्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली होती. यातून महिलेचे आणि सासरच्यांची भांडणं होतं होती. काही दिवसांनी सासरच्यांची एका मांत्रिका सोबत ओळख झाली. या मांत्रिकाने त्यांच्यातील वाद मिटवण्याचा बहाणा केला. यातून त्याने त्या महिलेला थोडे दिवस आपल्यासोबत राहण्यासाठी पाठवावे लागेल अशी अट घातली. सासरच्या मंडळींनी ही अट मान्य केली. महिलेला पाठवण्यास तयार झाले पण त्या महिलेने जाण्यास नकार दिला होता.

सासरच्या मंडळींना महिलेच्या जेवनात बेशुध्दचे औषध टाकून त्या महिलेला मांत्रिकाच्या हवाली केले. त्या महिलेसोबत तिचा अडिच वर्षाचा मुलगाही होता. या मंत्रिकाने महिलेला एका खोलीत डांबून ठेवले. मांत्रिक महिलेवर ७९ दिवस अत्याचार करत होता, असा आरोप महिलेने केला आहे.

Odisha rape
Tata Steel Factory Fire: टाटा स्टीलच्या प्रकल्पात मोठ्या स्फोटानंतर भीषण आग

२८ एप्रिल रोजी मांत्रिक त्याचा मोबाईल (Mobile) त्या खोलित विसरुन गेला, या मोबाईलवरुन त्या महिलेने माहेरी फोन करुन या घटनेची माहिती दिली. महिलेच्या माहेरच्या मंडळींनी पोलिसात (Police) तक्रार दिली. पोलीस मांत्रिकाच्या खोलीत पोहचले पण मांत्रिक फरार झाला होता. पोलिसांनी या मांत्रिका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेने आपल्या सासरच्या मंडळींविरोधातही तक्रार दाखल केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.