Women Dance : लग्नात नाचताना महिला बेभान; चिमुकला थोडक्यात बचावला, VIDEO पाहून थक्क व्हाल

मात्र नाचताना कुणाला त्रास नको याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.
Women Dance Video
Women Dance VideoSaam TV

Women Dance Video : लग्न म्हटलं तर गडबड गोंधळ आलाच. भारतात लगीनसराईचा हंगाम सुरू झाला की सोशल मीडियावर (Social Media) मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतात. कधी नवरदेव डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचतो. तर कधी नवरी लग्नमंडपात येताना डान्स करत येते. लग्नात नाचण्याची संधी मिळाली तर महिलाही ती सोडत नाही. मात्र नाचताना कुणाला त्रास नको याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. (Women Dance Viral Video)

Women Dance Video
VIDEO : बैलासोबत पंगा घेणं पडलं महागात; तरुणाची झाली भलतीच फजिती

सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतोय. या व्हिडीओत एका लग्नात ही महिला बिनधास्त होऊन नाचत आहे. नाचताना ही महिला इतकी बेभान झालीये की तिला कुठल्याही गोष्टीचं भान नाहीये. या महिलेसोबत इतरही महिला नाचताना दिसत आहे.

त्यावेळी या महिलेच्या पाठीमागे एक लहान मुलगा नाचण्यासाठी येतो. या मुलाकडे महिलेचं लक्ष नसतं. ती अगदी बेभान होऊन नाचत असते. मात्र, नाचताना थोडी मागे सरकते आणि त्याचवेळी तिचा या मुलाला धक्का लागतो. महिलेचा धक्का लागताच मुलगा जमिनीवर कोसळतो. (Women Dance Video)

तेव्हा या महिलेचं सुद्धा नाचनाता संतुलन बिघडतं अन् ही महिला थेट त्या मुलाच्या अंगावर कोसळते. हा धक्कादायक प्रकार एकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. सरकताच महिलेचा चिमुकल्याला धक्का लागतो आणि ती थेट खाली कोसळते. हा व्हिडीओ पाहून सध्या नेटकरी हसावं की घाबरावं अशा बुचकळ्यात पडले आहेत.

सुदैवाने या घटनेत सदरील मुलाला कुठलीही दुखापत झाली नाही. आपण मुलाच्या अंगावर पडलो असल्याचं लक्षात येताच, ही महिला ताबडतोब उठते. त्याचवेळी हा मुलगा मात्र, उठून धूम ठोकतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com