प्रियकरासोबत बायको पळाली; नवऱ्याची अवस्था पाहून अख्खं गाव गहिवरलं

Bihar Wife Run Away With Lover News : तो त्याच्या दोन मुलांसह एकटा राहिला आहे, आता त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला शिक्षा झाली पाहिजे.
Bihar Wife Run Away With Lover News
Bihar Wife Run Away With Lover NewsSaam Tv News

पटना: बिहारमधील बगहा येथे एका विवाहितेने तिच्या दोन मुलांना सोडून देत प्रियकरासह (Lover) पळ काढला आहे. पत्नीच्या (Wife) जाण्याने पती (Husband) इतका अस्वस्थ झाला आहे की, पळून गेलेल्या (Run Away) पत्नीला परत आणण्यासाठी त्याने गावकरी आणि पोलिसांकडे विनवणी सुरू केली आहे.

ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. हे प्रकरण बगहा (Bagaha) येथील नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरातील पंचफेडवा येथील आहे. पतीचे नाव ओमप्रकाश रावचे असून तो जयपूरमधील एका कापड कारखान्यात मजूर म्हणून काम करतो. (woman run away lover husband requested to bring back his wife eloped bagaha bihar police)

हे देखील पाहा -

पीडित पतीने सांगितलं की, तो कामासाठी जयपूरला गेला होता, घरी परतल्यावर त्याची पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. यानंतर तो इतका भडकला की, पोलिस स्टेशनपासून ते डीएसपी आणि एसपी ऑफिसपर्यंत त्याने फेऱ्या मारायला सुरुवात केली.

पीडित पती ओम प्रकाश याने नौरंगिया पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक करण्याची पोलिसांकडे मागणी केली. त्याची पत्नी ५० हजारांची रोकड आणि सुमारे दोन लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाल्याचे पीडित पताने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ओमप्रकाश म्हणतो की, तो त्याच्या दोन मुलांसह एकटा राहिला आहे, आता त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला शिक्षा झाली पाहिजे.

Bihar Wife Run Away With Lover News
अरे बापरे! हायवेवर सुस्साट वेगात होती कार, फ्रंट सीटवरच निघाला साप अन्...

ओमप्रकाश याने सांगितले की, पत्नीला परत आणण्यासाठी त्याने चार वेळा एसपीकडे अर्ज केला आहे. मात्र कारवाई होत नसल्याने तो नाराज आहे. आता ओमप्रकाश यांनी डीआयजींकडे अर्ज करून न्यायाची मागणी केली आहे. कापड कारखान्यात काम करणाऱ्या ओमप्रकाशच्या व्यथा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com