विमानात चढू न दिल्याने महिलेला आला पॅनिक अटॅक, Viral Videoनंतर एअर इंडियाचे स्पष्टीकरण

एका महिलेस एअर इंडियाच्या दिल्ली-वडोदरा विमानात उशीर झाल्यामुळे चढू देण्यात आले नाही. त्यामुळे सदर महिला चक्कर येऊन बेशुद्ध पडली.
विमानात चढू न दिल्याने महिलेला आला पॅनिक अटॅक
विमानात चढू न दिल्याने महिलेला आला पॅनिक अटॅकSaam Tv

दिल्ली : दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Delhi Airport) एका महिलेस एअर इंडियाच्या दिल्ली-वडोदरा विमानात (Delhi-Vadodara Flight) उशीर झाल्यामुळे बसू दिले नाही. त्यामुळे सदर महिला चक्कर येऊन बेशुद्ध झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral) झाल्यानंतर देशभरातील नेटिझन्सनी एअर इंडिया कंपनीस ट्रोल केल्याचे दिसून आले. बेशुद्ध झालेल्या महिलेस तातडीने वैद्यकीय मदत दिली नसल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

मात्र, एअर इंडियाने (Air India) हे सर्व आरोप फेटाळून लावत डॉक्टर तात्काळ घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत प्रवाशाची प्रकृती ठीक झाली होती. असे स्पष्टीकरण दिले आहे. (Woman suffers panic attack at Delhi airport after Air India denies entry)

या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) प्रमुख अरुण कुमार यांना विचारले असता ते म्हणाले की, "आम्ही संबंधित विमान कंपनीकडून अहवाल मागवत आहोत. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बोर्डिंग गेटजवळ एक मध्यमवयीन महिला जमिनीवर पडून आहे आणि तिचे नातेवाईक तिच्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत. एका निवेदनात एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की हा व्हिडिओ तीन प्रवाशांच्या संदर्भात आहे जे बोर्डिंग गेट (Gate) बंद असताना आले होते."

या प्रकाराबाबत अधिक बोलताना अरुण कुमार म्हणाले की, "गेट बंद होण्यापूर्वी एअरलाइन्स कर्मचारी संबंधित प्रवाशांचे नाव पुकारत होते. तसेच एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या प्रवाशांपैकी एकाला गेटजवळ जमिनीवर पडलेले पाहून, आमच्या जवानांनी ताबडतोब डॉक्टर आणि एका CISF जवानांना मदतीसाठी बोलावले. डॉक्टर घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्रवाशाला बरे वाटू लागले आणि त्याने कोणतीही वैद्यकीय मदत किंवा व्हीलचेअर घेण्यास नकार दिला."

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com