हुंड्यासाठी 5 वेळा लग्न, दोन वेळा हलाला; पीडितेची व्यथा ऐकून पोलीसही थक्क!

Uttar Pradesh Crime :
हुंड्यासाठी 5 वेळा लग्न, दोन वेळा हलाला; पीडितेची व्यथा ऐकून पोलीसही थक्क!
Uttar Pradesh HahalaSaam Tv

रायबरेली : उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) रायबरेली जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका महिलेला हुंड्यासाठी तब्बल ५ वेळा तलाक देण्यात आला आहे. इतकंच नाही तर तिचा दोनवेळा हलालाही करण्यात आलाय. याप्रकरणी पीडित महिलेने अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या तक्रारीनंतर केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Uttar Pradesh Hahala
आंध्र प्रदेश: रेल्वे स्टेशनवर पती आणि मुलांसमोर गर्भवतीवर सामूहिक बलात्कार, पैसेही लुटले!

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह ७ एप्रिल २०१५ रोजी देह येथील दांदू गावातील मोहम्मद आरिफसोबत झाला होता. मात्र, लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. त्यानंतर काही दिवसांनी पीडितेला तिच्या पतीने घटस्फोट दिला. दरम्यान, पीडित महिला तेव्हा पोलिसात तक्रार दाखल करणार होती. मात्र, कुटुंबियांनी पीडितेवर दबाव टाकला आणि हलालासाठी तिचं लग्न मेव्हण्यासोबत लावून दिलं. हलालानंतर मेव्हणा जाहिदने देखील घटस्फोट घेतला.

हे प्रकरण इथेच थांबलं नाही तर, २३ मार्च २०१७ साली पीडितेचं लग्न पुन्हा पहिला पती आरिफसोबत लावण्यात आलं. आरिफसोबत लग्न केल्यानंतर काही दिवस वातावरण शांत होतं. मात्र, त्यानंतर आरिफ आणि त्याच्या कुटुंबियांनी देखील पीडितेचा हुंड्यासाठी छळ सुरू केला. वारंवार मागणी करून सुद्धा पैसे मिळत नसल्याने आरिफनेही पीडितेला घरातून हाकलून दिलं. त्यानंतर त्याने घटस्फोट दिला. यादरम्यान, पीडितेचा मामा आणि सासरच्या मंडळींमध्ये समझोता झाला आणि पुन्हा एकदा हलाला करून पीडितेचं लग्न मेव्हणा जाहिदसोबत लावण्यात आलं. त्यानंतर जाहिदनेही पुन्हा पीडितेला घटस्फोट दिला. हा सर्व प्रकार एकाच कुटुंबात घडल्यामुळे याचा बाहेर कोणाला सुगावा लागला नाही.

Uttar Pradesh Hahala
सरपंच तिघींसोबत १५ वर्षे लिव्ह-इनमध्ये; ६ मुलांना जन्म, नंतर तिघींसोबत एकत्र लग्न

दरम्यान, जाहिदसोबत घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा पीडितेचं लग्न तिच्या पहिला पती आरिफसोबत लावण्यात आलं. मात्र, तिसऱ्यांदा लग्न करून सुद्धा १ मार्च २०२२ रोजी आरिफने पुन्हा पीडितेला घटस्फोट दिला. त्यानंतर पुन्हा पीडितेवर मेव्हण्यासोबत हलाला करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या सर्व प्रकारानंतर पीडितेच्या संयमाचा बांध फुटला आणि ती आपल्या माहेरच्या घरी गेली. काही दिवसानंतर पीडितेने तिचा पती आरिफ, सासू नसरीन, देवर बबलू, देवराणी बुऱ्हाण, मेव्हणा जाहिद, दुसरा मेव्हणा आमिर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.