देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली; प्रजनन दर कमी झाला

नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हे (NFHS) यानुसार देशामध्ये आता महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली असल्याची दिसून आली
देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली; प्रजनन दर कमी झाला
देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली; प्रजनन दर कमी झालाSaam Tv

वृत्तसंस्था : नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हे (NFHS) यानुसार देशामध्ये आता महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली असल्याची दिसून आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये आतापर्यंत १ हजार पुरुषांमागे १०२० महिला आहेत. प्रजनन दरामध्ये घट झाल्याचे या सर्वेक्षणामध्ये सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

या आकडेवारीवरुन हे स्पष्ट झाले आहे की, आता देशामध्ये महिलांची संख्या सतत वाढत आहे. याअगोदर परिस्थिती काही वेगळी होती. १९९० मध्ये दर १ हजार पुरुषांमागे फक्त ९२७ महिला होते. २००५- ०६ मध्ये झालेल्या तिसऱ्या NHFS सर्वेक्षणामध्ये १ हजार - १ हजारची बरोबरी झाली होती. यानंतर २०१५-१६ मध्ये चौथ्या सर्वेक्षणामध्ये ही आकडेवारी परत घसरली होती. १ हजार पुरुषांच्या तुलनेमध्ये ९९१ महिला होते. पण आता पहिल्यांदा महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त झाले आहे.

हे देखील पहा-

७८.६% महिला त्यांचे बँक खाते चालवत आहेत. २०१५-१६ मध्ये हा आकडा केवळ ५३% इतका होता. त्याचवेळी ४३.३% महिलांच्या नावावर काही मालमत्ता आहे, तर २०१५-१६ मध्ये हा आकडा केवळ ३८.४% इतका होता. मासिक पाळीच्या काळामध्ये सुरक्षित स्वच्छता उपायाचा अवलंब करणाऱ्या महिलांचे प्रमाण ५७.६% वरुन ७७.३% पर्यंत येऊन वाढले आहे. तर, लहान मुले आणि महिलांमध्ये अशक्तपणा हा एक प्रमुख चिंतेचा विषय झाला आहे. १५ ते ४९ वयोगटात ६७.१% मुले आणि ५७% स्त्रिया अशक्तपणामुळे ग्रस्त आहेत.

देशात प्रथमच पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली; प्रजनन दर कमी झाला
Parambir Singh: कोर्टानं फरार घोषित केलेले परमबीरसिंह अखेर मुंबईत परतले

२०१५-१६ मध्ये स्वतःची आधुनिक शौचालये असलेले कुटुंब ४८.५% इतके होती. २०१९-२१ मध्ये ही संख्या ७०.२% वर गेली आहे. मात्र ३० टक्के अजून देखील वंचित आहेत. देशात ९६.८% घरांमध्ये वीज पोहोचली आहे. परंतु, २००५-०६ मध्ये आयोजित केलेल्या NFHS-३ नुसार हे प्रमाण समानच राहिले आहे. देशामध्ये पहिल्यांदाच प्रजनन दर २ वर आला आहे. २०१५-१६ मध्ये हा २.२ इतका होता.

विशेष म्हणजे प्रजनन दर २.१ हा रिप्लेसमेंट मार्क मानला जातो. म्हणजेच लोकसंख्येची देखील वाढ २.१ च्या प्रजनन दराने स्थिर राहत आहे. यापेक्षा कमी प्रजनन दर हे लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्याचे लक्षणे आहेत. २०१९-२० या वर्षामध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा डेटा NFHS-५ मध्ये गोळा करण्यात आला आहे.

या दरम्यान सुमारे ६.१ लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. NFHS-५ मध्ये यावेळी काही नवीन विषयांचा समावेश करण्यात आला आहे. जसे की प्री- स्कूलिंग, अपंगत्व, शौचालय सुविधा, मृत्यू नोंदणी, मासिक पाळीच्या दरम्यान आंघोळ आणि गर्भपाताच्या पद्धती आणि कारणे असे विषय यामध्ये राहणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com