Work From Home New Rules : वर्क फ्रॉम होमसाठी नवे नियम; कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा

वर्क फ्रॉम होमसाठी वाणिज्य मंत्रालयाने नवीन नियम लागू केले आहेत. या विभागातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी असेल.
Work From Home New Rules News In Marathi
Work From Home New Rules News In MarathiSAAM TV

नवी दिल्ली: वर्क फ्रॉम होमसाठी वाणिज्य मंत्रालयाने नवीन नियम लागू केले आहेत. नव्या नियमांनुसार, स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट अर्थात विशेष आर्थिक क्षेत्राशी संबंधित विभागांत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी असेल. सरकारने वर्क फ्रॉम होमसंबंधी लागू केलेल्या नव्या नियमांचा आणखी कोणत्या कर्मचाऱ्यांना किती दिवस फायदा मिळेल हे जाणून घेऊयात. (Work From Home New Rules)

Work From Home New Rules News In Marathi
Video : बैठे काम, घटतोय आरोग्याचा दाम, 'वर्क फ्रॉम होम'मुळे आजारांना निमंत्रण

कोरोना (Corona) महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होमचं कल्चर सुरू झालं. भारतात बरेच महिने सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये बहुतांश कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम (Work From Home) केलं. जेव्हा कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होऊ लागली आणि परिस्थिती पूर्वपदावर किंवा नियंत्रणात आली त्यानंतर बऱ्याचशा कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयांत बोलावले. आता केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने वर्क फ्रॉम होमसाठी नवे नियम लागू केले आहेत.

Work From Home New Rules News In Marathi
Work From Home News : ऑफिस नको, वर्क फ्रॉम होम हवं!,पाहा व्हिडीओ

वाणिज्य मंत्रालयाने वर्क फ्रॉम होम संदर्भात नव्या नियमांची (Rules) घोषणा करताना सांगितले की, आता कर्मचाऱ्यांना (Employee) जास्तीत जास्त एका वर्षासाठी वर्क फ्रॉम होम मिळू शकेल. नव्या नियमांनुसार, ५० टक्के कर्मचाऱ्यांनाच वर्क फ्रॉम होम संदर्भात केलेल्या नव्या नियमांचा लाभ मिळेल. स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिटच्या ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी असेल. हे नियम वर्क फ्रॉम होमसाठी स्पेशल इकॉनॉमिक झोन नियम ४३ ए २००६ अधिसूचित करण्यात आले आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळेल फायदा

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सांगितेल की, कर्मचाऱ्यांच्या विनंतीनंतर विभागाने स्पेशल इकॉनॉमिक झोनसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंत्रालयाकडून अधिसूचित केलेल्या नव्या नियमांनुसार, सर्व इसईझेडमध्ये एकसमान देशव्यापी वर्क फ्रॉम होम योजनेचे पालन करण्याची उद्योग क्षेत्राची मागणी मान्य करताना या नवीन मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत.

कुणासाठी आहेत या नवीन गाइडलाइन्स

हे नियम आयटी/ आयटीईएस एसईझेड युनिटमधील कर्मचाऱ्यांना लागू असतील.

यामध्ये जे कर्मचारी अस्थायी स्वरूपात अक्षम आहेत किंवा प्रवासात असतील आणि जे ऑफसाइट काम करत आहेत, त्यांचा समावेश करण्यात येईल.

एसईझेड युनिट्सच्या वर्क फ्रॉम होमच्या अधिकृत संचालन करण्यासाठी त्यांना इन्स्ट्रूमेंट्स आणि सेफ कनेक्टिव्हीटी देण्यात येईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com