Kane Tanaka : जगातल्या सर्वात वृद्ध महिलेचं जपानमध्ये निधन

Kane Tanaka dies aged : केन यांनी त्यांच्या कुटुंबाने पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होतं की, "अनेक लोकांच्या पाठिंब्याने मी इथपर्यंत पोहोचू शकले. मला आशा आहे की तुम्ही आनंदी आणि उत्साही असाल."
World's oldest person, Kane Tanaka, dies aged (田中健)
World's oldest person, Kane Tanaka, dies aged (田中健)Twitter/ Guinness World Records

Kane Tanaka dies aged in Japan : जगातील सर्वात जास्त वय असलेली महिला केन तनाका (田中健) यांचे जपानमध्ये निधन झाले आहे. त्या पृथ्वीवरील ज्ञात असलेल्या सर्वात वृद्ध महिला होत्या. तसेच जगात सर्वात जास्त वय (Old Women) असल्याचा वर्ल्ड रेकॉर्डही (Guinness World Records) त्यांच्या नावावर आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या बुकमध्ये त्यांची नोंद आहे. त्यांचे निधन (Death) झाल्याचे ऐकून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड टीमला दु:ख झाले आहे. केन तनाका यांचं वय १९ एप्रिल २०२२ रोजी ११९ इतके होते. (Worlds oldest person and Guinness World Records Holder Kane Tanaka dies aged in japan)

हे देखील पाहा -

वरिष्ठ जेरोन्टोलॉजी सल्लागार रॉबर्ट यंग यांनी या बातमीची पुष्टी केली आहे, ज्यांनी 2019 मधील सर्वात वृद्ध व्यक्ती जिवंत (पुरुष) आणि सर्वात वृद्ध व्यक्ती (स्त्री) म्हणून केनच्या रेकॉर्डची पुष्टी करण्यास मदत केली. 3 एप्रिल 2022 रोजी केनच्या कुटुंबाने पोस्ट केलेल्या ट्विटनुसार, केन यांना अलीकडेच "रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता".

केन या सर्वात वृद्ध महिलेने वयाच्या 119 वर्षांचा उल्लेखनीय टप्पा गाठला. केन यांनी त्यांच्या कुटुंबाने पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होतं की, "अनेक लोकांच्या पाठिंब्याने मी इथपर्यंत पोहोचू शकले. मला आशा आहे की तुम्ही आनंदी आणि उत्साही असाल." केन यांचा जन्म 2 जानेवारी 1903 मध्ये झाला. कुमाकिची आणि कुमा ओटा यांचे ते सातवे अपत्य होत्या. त्या फुकुओका येथील विश्रामगृहात राहात होत्या.

World's oldest person, Kane Tanaka, dies aged (田中健)
मुंबईच्या सलग 8व्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माचे विधान, म्हणाला...

केन यांची टोकियो 2020 ऑलिम्पिक टॉर्च रिलेसाठी मशालवाहकांपैकी एक म्हणून निवड करण्यात आली होती, मात्र COVID-19 मुळे हा क्रायक्रम रद्द करण्यात आला होता. त्यांना गोड पदार्थ खायला खूप आवडायचं त्यामुळे त्यांना स्वीट टूथ म्हणून ओळखले जात होते. ज्या दिवशी त्यांनी अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान केले गेले, त्या दिवशी त्यांना चॉकलेटचा एक बॉक्स देखील मिळाला, जो त्यांनी लगेच उघडला आणि खायला सुरुवात केली. त्यांच्या निधनाने जपानमध्ये शोककळा पसरली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com