होरपळ सुरूच! घाऊक महागाई विक्रमी उच्चांकीवर; एप्रिलच्या आकड्यांनी सर्व रेकॉर्ड मोडले

किरकोळ महागाई दर आठ वर्षांतील उच्चांकीवर पोहोचले असतानाच, घाऊक महागाईनं एप्रिल २०२२ मध्ये सर्वच विक्रम मोडीत काढले.
WPI inflation Latest Update news in Marathi
WPI inflation Latest Update news in Marathi SAAM TV

WPI Inflation Latest News : महागाईनं पिचलेल्या सर्वसामान्यांची होरपळ सुरूच आहे. किरकोळ महागाई (Retail Inflation) आठ वर्षांतील उच्चांकीवर पोहचल्यानंतर, आता एप्रिल २०२२ मध्ये घाऊक महागाईनंही (Wholesale Inflation) सर्वच विक्रम मोडीत काढले. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात घाऊक किंमत निर्देशांक १५.०८ टक्के इतका राहिला. वर्षभरापूर्वी म्हणजेच, एप्रिल २०२१ मध्ये घाऊक किंमत निर्देशांक १०.७४ टक्के इतका होता. घाऊक महागाईनं एप्रिलमध्ये अनेक वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला. वाणिज्य मंत्रालयानं मंगळवारी घाऊक मूल्य आधारित निर्देशांक (WPI) ची आकडेवारी प्रसिद्ध केली. ती नऊ वर्षांतील सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले.

WPI inflation Latest Update news in Marathi
Inflation : महागाई 12-15 टक्क्यांनी वाढणार, किराणा सामानासह सर्वच वस्तूंचे दर कडाडणार | SAAM TV

वाणिज्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये घाऊक महागाई दराच्या निर्देशांकात वाढ होऊन तो १५.०८ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागील ९ वर्षांतील ही विक्रमी पातळी आहे. यापूर्वी मार्चमध्ये घाऊक महागाई (Inflation) निर्देशांक १४.५५ टक्के होता. मागील वर्षी एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर १०.७४ टक्के इतका होता.

डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) ने मंगळवारी एप्रिल महिन्यातील घाऊक महागाईची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार, तेल आणइ इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे एप्रिलमध्ये घाऊक महागाईत वाढ झाली आहे. त्यापूर्वी तज्ज्ञांनीही एप्रिलमध्ये घाऊक मूल्य आधारित महागाई १५.५ टक्क्यांच्या जवळपास राहील, असा अंदाज व्यक्त केला होता. ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल हा सलग १३ वा महिना आहे, ज्यात घाऊक महागाई दर १० टक्क्यांच्या वरच्या पातळीवर आहे. यापूर्वी मार्चमध्ये घाऊक महागाईचा दर १४.५५ टक्के इतका होता.

WPI inflation Latest Update news in Marathi
महागाई अन् चारा टंचाईमुळे पशुधन संकटात

डीपीआयआयटीच्या प्रेस रिलीजनुसार, एप्रिल २०२२ मध्ये घाऊक महागाई वाढण्यास मिनरल ऑइल्स, बेसिक मेटल्स, क्रूड, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस, खाण्यापिण्याच्या वस्तू, नॉन-फूड आर्टिकल्स, केमिकल्स आणि केमिकल प्रॉडक्टच्या वाढत्या किंमती कारणीभूत आहेत. या सर्व वस्तूंच्या किंमती गेल्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत प्रचंड वाढल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com