Cricketers Support Wrestlers: क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाने कुस्तीपटूंचं केलं समर्थन, गावस्कर-कपिल देवने केलं मोठं वक्तव्य

Wrestlers Protest News: क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाने कुस्तीपटूंचं केलं समर्थन, गावस्कर-कपिल देवने केलं मोठं वक्तव्य
1983 Cricket World Cup Winning Team Support Wrestlers
1983 Cricket World Cup Winning Team Support WrestlersSaam Tv

1983 Cricket World Cup Winning Team Support Wrestlers : भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटूंनी आपलं आंदोलन तीव्र केलं आहे. यातच आता कुस्तीपटूंना देशातील दिग्गज क्रिकेटपटूंचा पाठिंबा मिळाला आहे. प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि कपिल देव (Kapil Dev) यांच्यासारखे दिग्गज आंदोलक कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

वर्ष १९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाच्या खेळाडूंनी कुस्तीपटूंना पाठिंबा देणारे संयुक्त निवेदन जारी केले. यात गावस्कर आणि कपिल देव यांनी पैलवानांना कोणताही निर्णय घाईत घेऊ नका, असा सल्ला दिला.

1983 Cricket World Cup Winning Team Support Wrestlers
Pritam Munde Statement: उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तहसीलदारांना चिरीमीरी द्यावी लागते; खासदार प्रीतम मुंडेंचे खळबळजनक वक्तव्य

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ निवेदन देताना १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाने म्हटलं आहे की, अशा घटनांमुळे आम्ही निराश आहोत. दिग्गज क्रिकेटपटूंनी म्हटलं आहे की, कुस्तीपटू आपली पदके गंगा नदीत विसर्जित करण्याचा विचार करत आहे. अनेक वर्षे मेहनत, त्याग आणि संयमाने कुस्तीपटूंनी अशी पदके मिळवली जी देशासाठीही अभिमानाची गोष्ट आहे. (Latest Marathi News)

यातच गावस्कर आणि कपिल देव यांसारख्या दिग्गजांनी कुस्तीपटूंना आवाहन करून केलं आहे की, असे निर्णय घाईघाईत घेऊ नका. त्याचबरोबर कुस्तीपटूंच्या मागण्या आणि तक्रारी ऐकून लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

1983 Cricket World Cup Winning Team Support Wrestlers
Yavatmal Crime News : यवतमाळ एलसीबीची माेठी कारवाई; तिघांकडून 4 लाख 82 हजारांच्या बनावट नाेटा जप्त

तत्पूर्वी मंगळवारी कुस्तीपटूंनी आपले पदक गंगेत विसर्जित कण्यासाठी हरिद्वार येथे पोहोचले होते. मात्र त्यांना नरेश तिकट यांनी थांबवलं आणि त्यांना यावर लवकरच तोडगा काढू, असं त्यांनी आश्वासन दिलं.

कुस्तीपटू ब्रिजभूषण यांच्या अटकेच्या मागणीवर ठाम

बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांसारखे मोठे कुस्तीपटू अनेक दिवसांपासून ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com