Wrestler Protest : कुस्तीपटूंचा संयम सुटला; देशासाठी मोठ्या परिश्रमाने जिंकलेल्या मेडल्सबाबत टोकाचा निर्णय

Wrestlers Will Immerse Medals in Ganga : मोठ्या मेहनतीने देशासाठी मिळवलेले मेडल्स गंगेत टाकण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला आहे.
Wrestler Protest
Wrestler Protest Saam Tv

Wrestler Takes Big Decision: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचं सुरु असलेलं आंदोलन चिघळत चाललं आहे. लैंगिक छळाचा आरोप असेल्या ब्रिजभूषण यांना अटक होत नाही तोवर आंदोलन संपवणार नाही अशी भूमिका कुस्तीपटूंनी घेतली होती. कुस्तीपटूंच्या सहनशीलतेचा अंत होत असल्याचं दिसून येत आहे. कारण कुस्तीपटूंना आता टोकाची भूमिका घेतली आहे.

मोठ्या मेहनतीने देशासाठी मिळवलेले मेडल्स गंगेत टाकण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कुस्तीपटू आपली पदके गंगेत विसर्जित करणार आहोत. ही पदके आमचे जीवन आणि आत्मा आहेत. ते गंगेत वाहून गेल्यावर आमच्या जगण्याला काही अर्थ उरणार नाही. म्हणूनच आम्ही इंडिया गेट समोर आमरण उपोषणाला बसणार आहोत. याबाबतचं ट्वीट कुस्तीपटू साक्षी मलिकने केलं आहे.

साक्षी मलिकने ट्वीटमधील पत्रकात काय म्हटलं?

साक्षी मलिकेने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 28 मे रोजी काय घडले ते तुम्ही सर्वांनी पाहिले. पोलिस आमच्याशी कसे वागले? किती निर्दयीपणे आम्हाला अटक करण्यात आली. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. आमच्यावर गंभीर प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला.

महिला कुस्तीपटूंनी आपल्यावर झालेल्या लैंगिक छळाचा न्याय मागून काही गुन्हा केला आहे का? पोलीस आणि यंत्रणा आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक देत आहेत, तर अत्याचारी उघड सभांमध्ये आमच्यावर तुटून पडत आहेत.

ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली तेव्हाचे क्षण आज आठवत आहेत. आता आपल्या गळ्यात सजलेल्या या पदकांना काही अर्थ उरलेला नाही असे वाटते. त्यांना परत करण्याचा विचार करूनच आपण मरण यातना होत होत्या. पण स्वाभिमानाशी तडजोड करूनही काय जगायचे.

Wrestler Protest
Wrestlers Protest: बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट विरोधात गुन्हा दाखल, दंगल भडकावण्यासह अनेक कलमांतर्गत कारवाई

मात्र मेडल कुणाला परत करायचे हा प्रश्न पडला. राष्ट्रपतींना आम्ही आंदोलन करत असलेल्या ठिकाणापासून फक्त 2 किलोमीटर दूर बसल्या आहेत, पण काहीही बोलल्या नाहीत. आमच्या पंतप्रधानांना, जे आम्हाला त्यांच्या घरच्या मुली म्हणायचे. पण आपण केवळ घोषणा बनलो आहोत की केवळ सत्तेत येण्याचा अजेंडा बनलो आहोत?

आम्हाला आता या पदकांची गरज नाही. अन्याविरुद्ध आवाज उठवला तर आम्हाला तुरुंगात टाकण्याची तयारी केली जाते. म्हणूनच ही पदके आम्ही गंगेत टाकणार आहोत, कारण ती गंगा माता आहे. आपण गंगा जितकी पवित्र मानतो तितकेच पवित्र परिश्रम करून हे मेडल्स आम्ही मिळवली होती. ही पदके संपूर्ण देशासाठी पवित्र आहेत आणि पवित्र पदक ठेवण्यासाठी योग्य जागा पवित्र माता गंगा असू शकते.  (Latest News Update)

ही पदके आमचे जीवन आणि आत्मा आहेत. ते गंगेत वाहून गेल्यावर आमच्या जगण्याला काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसणार आहोत. इंडिया गेट हे आपल्या शहीदांचे स्थान आहे ज्यांनी देशासाठी बलिदान दिले. आता लोकांना विचार करावा लागेल की ते आपल्या या मुलींच्या पाठीशी उभे आहेत की या मुलींना त्रास देणार्‍या मजबूत पांढरपेशा व्यवस्थेच्या पाठीशी उभे आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com