Crime: एकुलत्या एक मुलाकडून संपूर्ण कुटुंबाची हत्या!
Crime: एकुलत्या एक मुलाकडून संपूर्ण कुटुंबाची हत्या!Saam Tv

Crime: एकुलत्या एक मुलाकडून संपूर्ण कुटुंबाची हत्या!

रोहतक मध्ये कुटुंबातील एकुलत्या एक 19 वर्षीय मुलाने आपले वडील, आई, बहीण आणि आजी यांची हत्या केली आहे.

रोहतक: हरियाणाच्या रोहतक Rohtak मध्ये कुटुंबातील एकुलत्या एक 19 वर्षीय मुलाने आपले वडील, आई, बहीण आणि आजी यांची हत्या केली आहे. आपल्या काही मित्र साथीदारांच्या मदतीने त्याने आपल्या परिवारातील व्यक्तींची हत्या केली आहे. अनेक दिवस रोहतक पोलीस या हत्याकांडाचा तपास Investigation करत होते. अखेर या हत्येचा सूत्रधार बाहेरचा कुणीच नसून घरातीलच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्याने या हत्याकांडाचा उलघडा झाला आहे.

हे देखील पहा-

हत्या करण्यामागचं कारण;

रोहतकमध्ये प्रदीप मलिक, त्यांची पत्नी, मुलगी नेहा, प्रदीप यांची आई आणि मुलगा अभिषेक राहत होते. प्रदीप मलिक यांनी त्यांच्या घरासाठी वारसदार म्हणून नेहाचं म्हणजेच त्यांच्या मुलीचं म्हणजेच नाव लावलेले होते. वडिलांची असे केले ही बाब अभिषेकला मान्य नव्हती. त्यांचे घर आपल्याच नावे असावं, असा त्याचा हट्ट होता. अचानक एक दिवस अभिषेक घरात नसताना काही हल्लेखोर घरात घुसले. आणि त्यांनी सर्व कुटुंबियांना गोळ्या घातल्या. यामुळे प्रत्येकाच्या डोक्यात गोळ्या घालून त्यांची हत्या Murder करण्यात आली.

या घटनेत घरातील तिघे जागीच ठार झाले आणि मुलगी नेहा गंभीर ही जखमी झाली. नेहाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान नेही हिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावण्यास सुरुवात केली.

Crime: एकुलत्या एक मुलाकडून संपूर्ण कुटुंबाची हत्या!
अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत खालावली; ICU मध्ये दाखल

असा लावला शोध

हत्येचा पुरावा कुठेच सापडत नसल्यामुळे अभिषेकवरच पोलिसांना संशय आला. घराची किल्ली बाहेर कशी गेली यावर पोलिसांना संशय येत होता. पोलिसी खाक्या दाखवताच अभिषेकने आपला गुन्हा Crime मान्य केला. अभिषेकच्या मित्रांनीच ही हत्या केली. आणि त्यांच्याकडे अभिषेकच्या घराची किल्ली Key पोलिसांना मिळाली. अभिषेक याला पोलिसांनी अटक केली आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधिक तपस करत आहेत. मात्र घराच्या प्रॉपर्टीच्या मोहापायी 19 वर्षांच्या एकुलत्या एका मुलाने सर्व कुटुंबाची हत्या केल्याच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com