धक्कादायक! 18 व्या मजल्यावरून उडी मारत तरुणीची आत्महत्या

मुलीच्या नातेवाईकांनी तिला एका खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
धक्कादायक! 18 व्या मजल्यावरून उडी मारत तरुणीची आत्महत्या
धक्कादायक! 18 व्या मजल्यावरून उडी मारत तरुणीची आत्महत्याSaam Tv

नवी दिल्ली - एका तरुणीचा ग्रेटर नोएडामधील टोलेजंग इमारतीतून खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिल्डिंगच्या 18 व्या मजल्यावरुन या तरुणीने उडी मारुन आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी नवरात्री निमित्त सर्व जण सोसायटीत खाली जमले असताना अचानक ही तरुणी खाली पडली.

हे देखील पहा -

मुलीच्या नातेवाईकांनी तिला एका खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या तरुणीचे मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

धक्कादायक! 18 व्या मजल्यावरून उडी मारत तरुणीची आत्महत्या
मूनमूनचा धक्कदायक व्हिडिओ व्हायरल, सॅनिटरी पॅड मध्ये लपवलं ड्रग्ज

मिळालेल्या माहितीनुसार, येथील टॉवर क्रमांक 8 मध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील सर्वात धाकट्या मुलीने शनिवारी संध्याकाळच्या सुमारास 18 व्या मजल्यावरुन उडी मारली. दरम्यान, ही घटना घडली त्यावेळी सोसायटीतील रहिवासी खाली फिरत होते. नवरात्रोत्सवामुळे सोसायटीमध्ये नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या तरुणीचे वय 20 असल्याची माहिती देण्यात आहे आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.