Ration Card : रेशनकार्ड धारकांना सरकारचा मोठा झटका, लाखोंचे रेशनकार्ड होणार रद्द; यादीत तुमचेही नाव आहे का?

लाखोंचे रेशनकार्ड रद्द होणार आहेत, कारण जाणून घ्या...
Ration Card
Ration Card Saam TV

Ration Card : रेशनकार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. रेशनकार्डवर आजवर मिळत असलेल्या सेवा आता बंद होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारमार्फत रेशन कार्डवर एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यात अनेकांचे रेशनकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. तसेच रेशनकार्डवर मोफत मिळणारी सेवाही बंद होऊ शकते. (Ration card latest news)

Ration Card
Sanjay Raut Bail: जामीन मंजूर झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

१० लाख रेशनकार्ड होणार रद्द

गरजू व्यक्तींसाठी शिधापत्रिकेचे वाटप केले जाते. मात्र अनेक व्यक्ती बनावट शिधापत्रिकेच्या सहाय्याने मोफत रेशन मिळवतात. अशा बनावट शिधापत्रिकाधारकांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार हे पाउल उचलत आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात एकूण १० लाख व्यक्ती बनावट शिधापत्रिकेद्वारे मोफत रेशन घेतात. त्यामुळे चिन्हांकीत केलेल्या सर्वच १० लाख व्यक्तींचे रेशनकार्ड (Ration Card) रद्द होणार आहे. त्या १० लाख व्यक्तींची यादी देखील सरकारने तयार केली आहे.

Ration Card
Sanjay Raut : सर्वात मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर

८० कोटी व्यक्तींना मिळतो मोफत शिधा

ज्या-ज्या नागरिकांकडे अशा प्रकारचे बनावट रेशनकार्ड आहे, त्यांच्याकडून योग्य ती वसुली देखील होणार आहे. ज्यांचे आर्थिक उत्पन्न फार कमी आहे अशा नागरिकांसाठी हे कार्ड आहे. मात्र अनेक व्यक्तींनी आपले उत्पन्न कमी दाखवून बनावट रेशनकार्ड बनवल्याने ते रद्द केले जाणार आहे. सध्या ८० कोटी नागरिक या सुविधेचा फायदा घेत आहेत. त्यामुळे मोफत सेवेतून त्यांना रद्द करण्यात आल्यावर गहू, तांदूळ, डाळ यापैकी प्रत्येक धान्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

Ration Card
Sanjay Raut Bail: संजय राऊतांना जामीन मंजूर, रोहित पवारांच्या ट्वीटची राज्यभर चर्चा

डिलरकडे पोहचवली आहे नावांची लिस्ट

सरकारने प्रत्येक रेशन दुकानातील विक्रेत्याकडे बनावट कार्ड असलेल्यांची यादी दिली आहे. त्यामुळे कोणताही व्यक्ती बनावट रेशनकार्ड घेऊन गेल्यास त्याच्या नावावरून बनावट असल्याची ओळख पटेल. जर तुमच्याकडे देखील असे बनावट कार्ड असेल तर आजच ते वापरणे बंद करा. अन्यथा तुम्ही हे कार्ड घेउन गेल्यावर ते बनावट असल्याची ओळख पटल्यास रेशन विक्रेते जिल्हा मुख्यालयात तुमची तक्रार नोंदवू शकतात.

या व्यक्तींचे कार्ड होणार रद्द

रेशन कार्डवर मिळणारे अन्नधान्य तुमच्या उत्पान्नावर स्वस्त दरात किंवा मोफत दिले जाते. यात मोफत धान्य मिळवण्यासाठी तुम्ही आयकर भरता का? तसेच तुमच्याकडे १० एकरपेक्षा जास्त जमीन आहे का? हे निकष तपासले जातात. जे आयकर भरतात आणि ज्यांच्याकडे १० एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा व्यक्तींचे मोफत रेशन बंद केले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com