मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या चर्चांवर अशोक गहलोत म्हणाले ...

राजस्थानमध्ये सध्या मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार चर्चा सुरू आहे.
ashok Gehlot
ashok Gehlot saam tv

जयपूर: राजस्थानमध्ये सध्या मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार चर्चा सुरू आहे. अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यामुळे आता राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आता मुख्यमंत्रिपद सचिन पायलट यांना दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमिवर आता अशोक गहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

' मी ४० वर्षे संवैधानिक पदांवर काम केले आहे आणि नवीन पिढीला संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेवर यावे यासाठी युकांकडे नेतृत्व दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया गहलोत यांनी दिली.

ashok Gehlot
CNG : महागाईचा भडका; सीएनजी, पीएनजीच्या किमतीत होणार वाढ

'माझ्यासाठी कोणतेही पद महत्त्वाचे नाही, असे मी आधीच सांगितले आहे. मी ५० वर्षांपासून राजकारण करत आहे आणि ४० वर्षे काही घटनात्मक पदे भूषवली आहेत. माणसाला यापेक्षा आणखी काय मिळू शकते किंवा हवी आहे. माझ्या मनातली गोष्ट अशी आहे की, नव्या पिढीला संधी मिळावी आणि त्यांनी मिळून देशाला नेतृत्व द्यावे, असंही अशोक गहलोत म्हणाले.

ashok Gehlot
येत्या 1 ऑक्टोबरपासून काय आर्थिक बदल होणार? तुमच्या पैशांची बचत होणार की खर्च वाढणार?

गहलोत रविवारी जैसलमेरमधील तनोट मातेच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. 'माझ्यासाठी कोणतेही पद महत्वाचे नाही, असंही गहलोत म्हणाले.

'मी ऑगस्टमध्येच हायकमांडला सांगितले होते की, पुढील निवडणूक अशा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली लढली पाहिजे जी राज्यात पुन्हा निवडणूक सत्ता मिळवू शकेल. राजस्थान हे एकमेव मोठे राज्य उरले आहे जिथे काँग्रेसची सत्ता आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस जिंकली तर पक्ष पुन्हा जिवंत होईल आणि इतर राज्यातही पक्ष विजय मिळवेल, असंही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com