हद्दच झाली! युवकाने चक्का फोन गिळला; परंतू परिस्थिती सुखरुप

डॉक्टरांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली
हद्दच झाली! युवकाने चक्का फोन गिळला; परंतू परिस्थिती सुखरुप
बापरे! युवकाने नोकिया 3310 फोनच गिळलाSaam Tv

नवी दिल्ली - एका व्यक्तीने चक्क पूर्ण नोकिया 3310 फोन गिळला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या व्यक्तीची महिन्याच्या सुरुवातीला सर्जरी Surgery करण्यात आली आहे. कोसोनोच्या प्रिस्टिना येथे राहणाऱ्या एका व्यक्तीनं नोकिया कंपनीकडून बनवलं गेलेलं मॉडेल गिळून घेतलं. हे मॉडेल 2000 साली लॉन्च झाल्यानंतर ईट फोन नावाने प्रचंड लोकप्रिय झालं होतं. या व्यक्तीने मोबाईल Mobile गिळल्यानंतर त्याला रुग्णालयात Hospital दाखल करण्यात आले.

हे देखील पहा-

या फोनला रुग्णाला काहीही तर न होऊ देता सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम डॉ. तेलजाकब यांना दिले गेले. या व्यक्तीचे स्कॅन आणि परीक्षण केले गेले. डॉक्टरांनी केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि हा फोन पोटातून बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.

बापरे! युवकाने नोकिया 3310 फोनच गिळला
बैलपोळ्यानिमित्त बैलांच्या पाठीवरुन दिला, कोरोना जनजागृतीचा संदेश!

डॉ. तेलजाकू यांनी फेसबुकवर शस्त्रक्रियानंतर काहीच वेळात या फोनचे फोटो, एक्स रे आणि एन्डोस्कोपीच्या कॉपी शेअर केल्या. तीन भागांमध्ये एक बॅटरी होती. यामुळेच चिंता अधिक वाढली होती. कारण या बॅटरीचा पोटात स्फोट होण्याची देखील शक्यता होती. हा व्यक्ती पोटात खूप त्रास होत असल्याने प्रिस्टिना येथील रुग्णालयात गेला आणि तपासणी केली त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com