चलिए खत्‍म करते हैं! आणखी एक राजीनामा पत्र व्हायरल

You Tube इंडियाने शेअर केले मजेशीर राजीनामा पत्र
Viral News
Viral NewsSaam Tv

Viral News: एकीकडे बेरोजगारीची वाढत असतानाच दुरीकडे हजारो तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. आजच्या काळात, लोकांसाठी पैसे कमवण्यापेक्षा नोकरीचे समाधान महत्त्वाचे आहे. म्हणजेच नोकरीत मिळणारे समाधान, आनंद आणि शांती. अनेक लोक नोकरीमुळे इतके त्रस्त होतात की ते डिप्रेशनमध्ये जातात. नोकरी सोडण्याचे धाडस करणारे कमी लोक असतात, कारण नोकरीशिवाय उदरनिर्वाह करणे कठीण असते.

एखाद्या कंपनीतून, संस्थेतून आपल्या पदाचा राजीनामा देणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. राजीनामा देण्यासाठी एक पत्र लिहावं लागतं. जिथं आपण काम करतो त्याठिकाणी आपल्या वरिष्ठांना आपण संबंधीत कंपनी, संबंधीत संस्था अथवा राजकारणात पक्षाचा जरी राजीनामा द्यायचा असेल तर शक्यतो त्यासाठीचं कारण हे आपल्या राजीनामा पत्राद्वारे सांगावं लागतं.

जर ते कारण आपल्याला सांगायचं नसेल तरी तसा उल्लेख करावा लागतो. यासाठी ४ ते ५ ओळींचं राजीनामा पत्र लिहीलं जातं. पण, सध्या कोणत्याही नोकरीचा निरोप घेणे काहीसे कठीण होऊन बसले असून नोंदणी पत्र लिहिताना अनेकजण भावूक होताना दिसत आहेत. असंच एक राजीनामा पत्र सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

यूट्यूब इंडियाचे एका राजीनाम्याचे फोटो ट्विट करत. यूट्यूब इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेले हे ट्विट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटो शेअर करण्यासोबतच यूट्यूब इंडियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, nice resignation letter.

काय लिहले आहे राजीनामा पात्रात?

हे राजीनामा पत्र फक्त दोन ओळींचे आहे. यामध्ये या व्यक्तीने "to whomsoever it may concern Chaliye Khatam karte hai" असे लिहिले आहे. यूट्यूब इंडियाच्या या ट्विटला आतापर्यंत जवळपास 9 हजार लोकांनी लाईक केले आहे. त्याच वेळी, साडे सातशेहून अधिक लोकांनी ते रिट्विट केले आहे, तर सुमारे 125 लोकांनी यावर मनोरंजक कमेंट्स दिल्या आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com