Viral Video : तरुणांचा 'कार'नामा! धावत्या कारमधून फेकल्या 500-2000 नोटा; नेमकं घडलं तरी काय?

Farzi Movie Scene : पोलिसांनी व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आता गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.
Viral Car
Viral Car Saam TV

Delhi News : दिल्ली जवळील गुरुग्रामचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण चालत्या कारमधून चलनी नोटा फेकताना दिसत आहे. पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आता गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.

सफेद रंगाच्या कारमधून नोटा उडवल्या जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओ फक्त 15 सेकंदांचा आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण गाडी चालवत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे आणखी एका तरुणाने तोंडावर कपडा बांधला आहे. तो गाडीच्या ट्रंकमधून पैसे रस्त्यावर फेकत आहे.

Viral Car
Snake Viral Video: बाप रे बाप, शाळेच्या वर्गात घुसला साप! विद्यार्थ्यांसह शिक्षकांची उडाली तारांबळ, पाहा व्हिडीओ

यूट्युबर जोरावर सिंग कलसी आणि त्याचा मित्र लकी कंबोज या दोघांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे. रील बनवण्यासाठी हे गाडीतून पेसै फेकत होते. गुरुग्रामच्या डीएलएफ गोल्फ कोर्स रोडच्या अंडरपासवरील २ मार्चची ही घटना आहे. पोलिसांनी त्यांच्यावर धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्याचा आरोप लावला आहे. (Viral Video)

शाहिद कपूरच्या फर्जी या वेब सीरिजमधील एक सीन रिक्रिएट करण्याच्या प्रयत्नात दोघे होते. जोरावर सिंग कलसी कार चालवत असताना व्हिडिओमध्ये रुमाल बांधलेला लकी कंबोज पांढऱ्या बलेनोच्या ट्रंकमधून पैसे फेकताना दिसतो आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ बनवण्यासाठी हे सगळं सुरु होतं. हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला होता पण नंतर तो हटवला.

Viral Car
Prakash Surve: 'मला बहिणीसमान असणाऱ्या...'; शीतल म्हात्रेंच्या त्या व्हायरल व्हिडिओवर प्रकाश सूर्वे पहिल्यांदाच बोलले

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि धोकादायक ड्रायव्हिंग आणि इतरांचा जीव धोक्यात आणल्याबद्दल मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिल्लीतील टिळकनगर येथील रहिवासी जोरावर सिंग कलसी म्हणून वाहन मालकाची ओळख पटवली आणि त्याला अटक केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com