Bank Job 2022 : बँकांमध्ये ६००० हून अधिक पदांसाठी जागा, आजच अर्ज करा, ही आहे शेवटची तारीख

सरकारी नोकरी शोधताय तर येथे अर्ज करा.
Bank Job Alert
Bank Job AlertSaam TV

Bank Job 2022 : तुम्ही पदवीधर आहात, नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी आहे आनंदाची बातमी. इनस्टिट्यूट ऑफ पर्सनल सिलेक्शन (IBPS)ने विविध बँकांमध्ये बँकेत (Bank) नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली संधी निर्माण केली आहे.

इनस्टिट्यूट ऑफ पर्सनल सिलेक्शनने विविध बँकांमध्ये PO पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार या पदांसाठी २२ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट देऊ शकता.

कोणत्या बँकेमध्ये आहे संधी -

बँक ऑफ इंडियामध्ये ५३५ पदे

कॅनरा बँकेत २५०० पदे

पंजाब नॅशनल बँकेत ५०० पदे

पंजाब आणि सिंध बँकेत २५३ पदे

युको बँकेत ५५० पदे

युनियन बँक ऑफ इंडिया २०९४ पदे

Bank Job Alert
Job Alert: BSF मध्ये 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी 2788 जागांसाठी होणार भरती

शैक्षणिक पात्रता -

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयाची मर्यादा -

या पात्रतेला अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय २० वर्ष व ३० वर्ष हे निश्चित करण्यात आले आहे. तसेच या जागेसाठी उमेदवाराला १४,५०० ते २५,७०० रुपये पगार (Salary) देण्यात येईल.

अर्ज शुल्क -

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागेल.

१. सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएसला ८५० रुपये

२. एससी-एसटी व पीडब्यलूडीला १७५ रुपये

निवड कशी होईल ?

- या पदांसाठी तीन टप्प्यांत उमेदवारांची निवड केली जाईल.

- पहिला टप्पा- प्राथमिक परीक्षा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा मुलाखत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com