पोलीस गणवेश घालून व्यापाऱ्याला लुटणारी टोळी गजाआड

police
police

मुंबई : एका व्यापाऱ्याला पोलिसाचा गणवेश घालून (Police) लुटणाऱ्या टोळीला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शशिकांत दयाराम म्हात्रे, दर्शील प्रवीण गोसर, निलेश अरविंद मिश्रा, प्रेमचंद उर्फ गोट्या किसन चिकनकर सर्व रहाणार कल्याण अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत. Navghar police nab gang who robbed a trader wearing police uniform

मुलुंडच्या (Mulund) नीलम नगर येथील बँकेत (Bank) विविध व्यापाऱ्यांचे २७ लाख रुपये भरण्यासाठी  फिर्यादी जिग्नेश शहा जात होते. या वेळी त्यांना शशिकांत म्हात्रे याने पोलिसांचा युनिफॉर्म घालून थांबविले. त्याच्या सोबत त्याची टोळी देखील होती. त्याने त्यांना लायसन्स कागदपत्रांची विचारणा केली. आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचे भासवून या व्यापाऱ्याची मोटार सायकल आणि २७ लाख रुपये रोख रक्कम घेऊन या टोळीने पळ काढला.

या बाबत नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच नवघर पोलिसांची तपास यंत्रणा कामाला लागली. संबंधित पोलीस खरा की बोगस याचा छडा लावणे आवश्यक होते. नवघर पोलिसांसह क्राईम ब्रँच (Crime Branch) सुद्धा कामाला लागली होती.  नवघर पोलिसांनी रात्रंदिवस सतत तपास करत, सर्व शक्यतांचा सखोल अभ्यास करीत सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्यातील मोटार सायकल नंबर प्राप्त केले. त्यावरून मोबाईल (Mobile) नंबर शोधून त्यांच्या सिडीआर (CDR) चा तांत्रिक अभ्यास करून, कल्याण येथून या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. Navghar police nab gang who robbed a trader wearing police uniform

सदर गुन्ह्यात पोलीस गणवेश घालून पोलीस असल्याची बतावणी करणारा शशिकांत म्हात्रे हा खरा पोलीस नसून एक रिक्षा ड्राइव्हर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. नवघर पोलिसांनी १६ लाख १० हजार रोख रक्कम, १ लाख रुपयांचा ऐवज १ स्कुटर असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

Editing By-Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com