आजपासून आदिशक्तीचा जागर 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 सप्टेंबर 2019

दरवर्षीप्रमाणेच यंदाही नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी विशेष तयारी केली आहे. अनेक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांकडून देवीची स्वतंत्र गाणी तयार करण्यात आली आहेत.नवरात्रीवर यंदा पावसाचे सावट असले तरी सणांच्या रंगांपासून मुंबईकर स्वतःला वेगळे ठेवू शकत नाहीत. नवरात्री हा तर मनमुराद नाचण्याचा, रंगांमध्ये सजण्याचा सण असल्याने त्यासाठी मुंबईने जय्यत तयारी केली आहे. आज, रविवारपासून जागोजागी गरबा आणि दांडिया रंगेल व उत्सवरात्री सुरू होतील.

मंदीचा सामना करत उत्सवाच्या उत्साहाला ओहोटी लागू न देता देवीसाठीही भव्य सजावट करण्यात आली आहे.सणांची परंपरा जपण्यासोबत या मंडळांनी सामाजिक भानही जपले आहे. अनेक मंडळांनी पश्चिम महारष्ट्रातील पूरग्रस्त भागात जाऊन आर्थिक, जीवनावश्यक वस्तूंची मदत स्वतः सुपूर्द केली आहे. 

यंदा मंदी आणि पावसाचा सणांवर परिणाम झाला आहे. मात्र रोजच्या धावपळीतून आनंदाचे चार क्षण नवरात्रीत नक्कीच मिळतात. गरबा खेळण्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा साठवण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. आता पुढील नऊ रात्री अनेक मुंबईकर चनिया, घागरा, कुर्ते, इंडो-वेस्टर्न कपडे घालून मुंबईला आपल्या अनोख्या रंगांमध्ये रंगवणार आहेत. नवरात्रीनिमित्त खरेदीसाठी शनिवारी स्थानिक बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. घागरा, रंगीत जॅकेट, चमकदार ब्लाऊज, कुर्ते यांच्या स्टॉलला गराडा होता. पावसाचा फटका फुलबाजाराला बसला असला तरी घरी घट बसवणाऱ्यांची फुलबाजारात गर्दी होतीच.

Web Title navratri utsav starts from today
 
संबंधित बातम्या

Saam TV Live