VIDEO | मन सुन्न करणारी बातमी! नेव्हीच्या जवानाला जीवंत जाळलं...या कारणासाठी...

साम टीव्ही
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

मन सुन्न करणारी. दहा लाखांच्या खंडणीसाठी एका नौदलातल्या जवानाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडलीय. पैशांसाठी सुरजकुमार दुबे या जवानाची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आलीय.

सूरजकुमार दुबे, मूळ गाव रांची, झारखंड, भारतीय नौदलातील सैनिक बातमी आहे मन सुन्न करणारी. दहा लाखांच्या खंडणीसाठी एका नौदलातल्या जवानाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडलीय. पैशांसाठी सुरजकुमार दुबे या जवानाची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आलीय.

नौदलाच्या आयएनएस अग्रणी या नौकेवर कर्तव्यावर असलेला सुरजकुमार दुबे.. देशाच्या रक्षणाचं कर्तव्य बजावणाऱ्या या सैनिकाला जिवंत जाळण्यात आलंय. ऐकतानाही धक्का बसावा असा हा प्रकार घडलाय पालघरमध्ये. पालघरच्या तलासरी तालुक्यातील वेवजीमध्ये सुरजकुमारसोबत हा अमानवीय प्रकार घडलाय. 

सुरजकुमार यांचं 31 जानेवारीला चेन्नईमधून 3 अनोळखी व्यक्तिंकडून अपहरण करण्यात आलं. त्यांच्याकडे तब्बल 10 लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. खंडणी न मिळाल्यानं 3 दिवस त्यांना चेन्नईमध्ये लपवून ठेवण्यात आलं. त्यानंतर सूरजकुमार यांना पालघरच्या वेवजीच्या जंगलात आणून झाडाला बांधून जिवंत जाळण्यात आलं. आगीपासून जीवाची सुटका करून घेत असताना या सैनिकाला काही स्थानिकांनी पाहिलं आणि पोलिसांना बोलावलं.

 पोलिसांनी तत्काळ  डहाणू इथं प्राथमिक उपचार करून सुरजकुमार यांनी मुंबईला हलवलं असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झालाय. 

 पालघरमध्ये हा प्रकार घडल्यानंतर भाजपने राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय. या राज्यात ना साधुसंत सुरक्षित आहेत ना जवान सुरक्षित आहेत. मात्र हे सरकार आधळं बहिरं झाल्याचा गंभीर आरोप भाजप नेते राम कदम यांनी केलाय. 

तर महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन लवकरात लवकर आरोपींच्या मुसक्या आवळतील असं आश्वासन गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलंय. 

झारखंडमधील जवानाच्या झालेल्या हत्येनंतर विरोधकांनी पुन्हा एकदा राज्याच्या गृहखात्यावर निशाणा साधलाय. सत्ताधारी विरोधकांचे आरोप प्रत्यारोप सुरु झाले असले तरी आरोपींना गजाआड करून सुरजकुमार यांनी न्याय मिळणं गरजेचं आहे..
 


संबंधित बातम्या

Saam TV Live