नवाब मलिक यांनी मागीतली अण्णा हजारेंची लेखी माफी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

पारनेर - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हजारे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल चूक मान्य करत दिलगीर व्यक्त केली आहे. 

मलिक यांनी "हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात" अशी बदनामीकारक व धादांत खोटी वक्तव्ये  केली होती. याबाबत हजारे यांनी मलिक यांना दोन फेब्रुवारीला अॅड. मिलिंद पवार यांचे वतीने कायदेशीर नोटिस पाठवली होती.

याबाबत मलिक यांनी ऍड. पवार यांना रजिस्टर्ड पत्राने ऊत्तर पाववून दिलगीरी व्यक्त केली आहे. "आपण वडीलधारी व्यक्ती असुन, आपले मन दुखावल्याने मी देखील दिलगीरी व्यक्त करतो" असे लेखी ऊत्तर नवाब मलिक यांनी पाठविल्याने आपल्याला देखील पुढे या प्रकरणी कोणताही वाद वाढवायचा नाही असे अण्णांनी ऍड पवार यांना सांगितले आहे.  

लोकपाल व लोकआयुक्ताच्या नियुक्तीचा कायदा संमत होऊनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे हे राळेगणसिध्दी येथे 30 जानेवारी  पासुन बेमुदत उपोषणास यादवबाबा मंदिरात बसले होते.

हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर मलिक यांनी यांनी हे वक्तवे केले होते. त्यावेळी माजी ऊप मुख्यमंत्री अजित पवार यांचीही दिलगिरी व्यक्त केली होती.

Web Title: Nawab Malik's written apology to Anna Hazare

संबंधित बातम्या

Saam TV Live