आंध्रातील नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण; शरण येण्याचे आवाहन

Naxals in Andhra Pradesh Affected by Corona
Naxals in Andhra Pradesh Affected by Corona

हैदराबाद/विशाखापट्टणम : आंध्र प्रदेश-ओडिशा सीमा आणि आंध्र प्रदेश Andhra Pradesh छत्तीसगड Chattisgarh सीमेवर अनेक नक्षलवादी आणि म्होरके कोरोनाग्रस्त झाल्याचे उघड झाले आहे. पोलिस Police सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम भागात असलेले नक्षलवादी Naxal म्होरके आणि नक्षलवाद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. गुप्तचर विभागाने यासंदर्भातील सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिली आहे. Naxalites in Andhra Pradesh affected by Corona Virus

नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे उघड झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी पूर्व गोदावरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अदनान नईम अस्मी यांच्यासह अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्त नक्षलवाद्यांवर उपचार Medical Treatment करण्याची घोषणा केली होती. कोणत्याही भितीशिवाय शरण येणाऱ्या नक्षलवाद्यांना उपचाराची सुविधा देण्यात येईल असे म्हटले होते. 

हे देखिल पहा - 

भद्रादी कोत्तागुडेम, ईस्ट गोदावरी दलम, गालिकोंडा दलम, कोरुकोंडा, पेद्दा बयलू, शबरी एरिया कमिटी, कुंटा एरिया कमिटीशी संलग्न असलेले म्होरके, नक्षलवादी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक होऊ नये यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी नक्षलवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले आहे. शरणागती लवकर पत्करल्यास उपचारही तातडीने करणे शक्य आहे, असे आवाहनात म्हटले आहे. Naxalites in Andhra Pradesh affected by Corona Virus

पूर्व गोदावरी जिल्ह्याच्या दब्बा पालमशी निगडित जलुमुरी श्रीनू ऊर्फ रैनो, विशाखाशी संलग्न अरुणा, कुमुलवाडाशी संलग्न काकुरी पांडन्ना ऊर्फ जगन पामुलागोंदीची ललिता, पेद्दावाडाचे कोर्रा राजू आणि रामे, शबरी दलमचे गीता आणि चिलका, पोन्गुट्टाचे दिरडा आणि देवी, अल्ली वागूचे सुशीला, कुंटा एरिया कमिटीशी निगडित उंगा, मासा आणि मांगुडू हे नक्षलवादी कोरोनाबाधित असून ते पूर्व गोदावरी जिल्हा परिसरात फिरत असल्याचे गुप्तचर विभागाने म्हटले आहे. हे सर्व नक्षलवादी आंध्र-ओडिशा सीमा आणि आंध्र प्रदेश- छत्तीसगड सीमेवर सक्रिय आहेत.
Edited By - Amit Golwalkar
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com