राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं रेमडेसिविरसाठी केला थेट भाजप नगरसेवकाचा नंबर शेअर

गोपाळ मोटघरे
मंगळवार, 13 एप्रिल 2021

राज्यात कोरोनाची संख्या वाढत असताना दुसरीकडे अत्यवस्थ रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमिडेसिविर  इंजेक्शनवरुन राजकारण तापले आहे. यावरुन राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यानं चक्क भाजप नगरसेवकाचा नंबर सोशल मिडियावर शेअर केला आहे.

पिंपरी : राज्यात कोरोनाची संख्या वाढत असताना दुसरीकडे अत्यवस्थ रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमिडेसिविर  इंजेक्शनवरुन राजकारण तापले आहे. यावरुन राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकर्त्यानं चक्क भाजप नगरसेवकाचा नंबर सोशल मिडियावर शेअर केला आहे.

गेल्या आठवड्यापासून शहरातील नागरिकांना रेमडेसिविर Remedesivir इंजेक्शन मिळवण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांतील औषध विक्रीची दुकानं तसेच औषध विक्रेत्या संघटनेच्या कार्यालयाबाहेर रांगा लावून रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात गेल्या महिनाभरापासून कोरोना Corona रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागल्यानं बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. NCP activist shared BJP leader number directly for RemediSivir

यावरून राजकारणदेखील Politics तापलं आहे. गुजरातमधील Gujarat भारतीय जनता पक्षाच्या BJP कार्यालयात रेमडेसिविरचा मोठा साठा आढळून आले आहे. भाजपकडून रेमडेसिविरची साठेबाजी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं NCP केला आहे. यानंतर आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं रेमडेसिविर औषधासाठी संपर्क करा असं आवाहन करत भाजपच्या नेत्याचा नंबर सोशल मीडियावर social media शेअर केला आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसशी संबंधित एका कार्यकर्त्यानं पिंपरी चिंचवड शहरासाठीच्या फेसबुक पेजवर एक मोबाईल नंबर शेअर केला आहे.

रेमडेसिविर औषध हवं असल्यास संबंधित क्रमांकावर तात्काळ संपर्क साधा, असं आवाहन या कार्यकर्त्यानं केलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं शेअर केलेला मोबाईल नंबर पिंपरी चिंचवडचे Pimpri Chinchwad भाजप नगरसेवक नामदेव ढाकेंचा आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं फेसबुक पोस्टमध्ये नंबर दिल्यामुळे गेल्या दोन दिवसांत ढाकेंना अनेकांनी रेमडेसिविर औषधासाठी फोन केले आहेत.

Edited By- Digambar Jadhav 


संबंधित बातम्या

Saam TV Live