शरद पवार यांनी केले ममतादिदींचे अभिनंदन!

साम टिव्ही ब्युरो
रविवार, 2 मे 2021

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील तृणमूल काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता दिदींचे अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील तृणमूल काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममता दिदींचे अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे. राज्यात पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच सत्ता स्थापन करणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीच्या आधी पवार यांनी भाजप विरोधी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते.. NCP Chief Sharad Pawar congratulated Trinamool Leader Mamata Banerjee

पश्चिम बंगाल निवडणुकीचे कल हळूहळू स्पष्ट होत आहेत. राज्यात पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांचीच लाट आहे, हे आतापर्यंतच्या कलांवरुन स्पष्ट होते आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. २९४ जागांच्या विधानसभेत १४७ बहुमताचा आकडा आहे. गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २११ जागा मिळाल्या होत्या. पश्चिम बंगालची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची बनवली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह दिग्गज नेत्यांनी येथे मोठ्या सभा घेतल्या. भाजपने निवडणुकीआधी तृणमूलचे अनेक नेते फोडून ममता बॅनर्जींना धक्का देण्याचा प्रयत्न केला. ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आहेत. यावेळी पश्चिम बंगालमधली जनता पुन्हा एकदा त्यांच्याच हाती सत्तेच्या चाव्या सोपवेल असे स्पष्ट होत आहे. NCP Chief Sharad Pawar congratulated Trinamool Leader Mamata Banerjee

पवार यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करणारे ट्वीट केले आहे. ''ममता बॅनर्जी आपल्या विलक्षण विजयी घोडदौडीबाबत आपले अभिनंदन. जनतेच्या कल्याणासाठी आपण सर्वजण एकत्र काम करु व कोरोना महामारीच्या या संकटावर एकत्रित मात करु,'' असे पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live