भाजपला इतक्या जागा मिळणे अनपेक्षित : पवार

भाजपला इतक्या जागा मिळणे अनपेक्षित : पवार

मुंबई : आघाडीला देशात काही राज्यांमध्ये यश मिळेल अशी आशा होती. मात्र, यश मिळाले नाही. शेवटच्या टप्प्यात भाजपने बाजी मारली. गुहेत जाऊन बसण्याचा चमत्कार देशाने पाहिला. भाजपला इतक्या जागा मिळणे अनपेक्षित होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (गुरुवार) जाहीर होत असून, भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) मोठे यश मिळाले आहे. एनडीएला जवळपास 350 जागा मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी सांगितले, की राज ठाकरेंचे उमेदवार नव्हते, त्यामुळे त्याचा फरक पडताना दिसला नाही. मनसेचे उमेदवार असते, तर चित्र वेगळे असते. वंचित आघाडीचा फटका किती ठिकाणी बसला, हे सांगणे आता कठीण आहे. 

शरद पवार म्हणाले, की रायगड, बारामती, शिरूर, सातारा या चार मतदारसंघात उमेदवार विजयी झाले आहेत. माढा आणि अमरावतीमध्ये मतमोजणी बाकी आहे. येथील परिस्थिती आम्हाला यश मिळेल असा अंदाज आहे. आमची अपेक्षा जास्त होती, परंतू जो काही नागरिकांनी निकाल दिला तो आम्हाला मान्य आहे. जनाधार वाढविण्याची खबरदारी आता आम्ही घेणार आहोत. दुष्काळ आणि संकटग्रस्त भागात जाऊन नागरिकांशी संपर्क साधण्याचा कार्यक्रम आम्ही आखत आहोत. आम्ही ज्या जागा गमावत आहोत, त्या मोठ्या फरकाने गमावत आहोत असे नाही. राजू शेट्टींनाही यश मिळताना दिसत नाही. मी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतलेला होता. मावळची जागा आम्ही जिंकलेली नव्हती, पण यंदाही अपयश आले. आमच्या कार्यकर्त्यांनी प्रय़त्न केले. यंदा प्रथमच ईव्हीएमबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. ईव्हीएमबाबत नागरिकांच्या मनात संशयाचे भूत आहे. तसेच निवडणूक आयोगाबाबतही संभ्रम निर्माण झालेला होती. लोकांनी मोदींकडे पाहून मत देण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत आणि राज्याच्या निवडणुकीत फरक आहे. बऱ्याचवेळा दोन्ही निवडणुकांमधील निकाल वेगवेगळे लागलेले आहेत.

Web Title: NCP chief Sharad Pawar talked about Loksabha election 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com