(VIDEO) राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 जानेवारी 2019

अहमदनगरच्या महापौर निवडणुकीत भाजपला पाठींबा दिल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटवण्यात आलंय.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आलीय. महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला. या नगर पॅटर्नवर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चाही झाली.

त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या नगरसेवकांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार आता या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. पण आमदार संग्राम जगपात यांना मात्र अभय देण्यात आलंय. 

WebTitle : NCP expels 18 corporators of Ahmednagar Municipal Corporation who voted for BJP

संबंधित बातम्या

Saam TV Live